शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अकोला विमानतळ विस्तारीकरणाची शक्यता दुरावली!

By admin | Updated: May 27, 2014 19:30 IST

विमानतळ प्राधिकरणाचे शासनाला पत्र विमान उड्डयनाचा परवाना मिळण्याची शक्यता नाही

अकोला : शिवणी विमानतळावरील धावप˜ीच्या विस्तारीकरणाची शक्यता दुरावली आहे. विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) १५ मे रोजी राज्य शासनाचे मुख्य सचिव पी.एस. मीना यांना दिलेल्या पत्रात अकोला विमानतळावरून विमान उड्डाणचा परवाना न मिळण्याची शक्यता वर्तविली असल्याने विस्तारीकरणाचा प्रश्न कायमस्वरूपी मागे पडू शकतो. अकोला येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आणि सध्या आहे त्या धावप˜ीची लांबी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून १७४.७६ एकर अतिरिक्त जागेची आवश्यकता भासणार आहे. याबाबतचा प्रस्ताव २00८ मध्ये मांडण्यात आला होता. विमानतळ प्राधिकरणाने त्यासाठी राज्य शासनाला आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. विमानतळाच्या एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग असून, दुसर्‍या बाजूला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने धावप˜ी वाढविणे शक्य नसल्यामुळे पीडीकेव्हीची जागा अधिग्रहित करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी एक दिवस आधी ४ मार्च रोजी राज्य शासनाने त्याबाबतचे आदेशही दिले होते. राज्य शासनाने विस्तारीकरणासाठी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात अकोला विमानतळावरून विमान उड्डाणाची परवानगीच मिळण्याची शक्यता दुरावली आहे. एएआयच्या कार्यकारी संचालक कल्पना सेठी यांनी १५ मे रोजी राज्य शासनाचे मुख्य सचिव पी.एस. मीना यांना एक पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये नागरी उड्डयन महासंचालनालय (डीजीसीए) आणि नागरी उड्डयनाबाबतच्या आवश्यक उपाययोजना अकोला विमानतळावर नसल्यामुळे आणि येथून विमान सुरू करण्याची मागणी नसल्यामुळे अकोला विमानतळाला विमान उड्डयनाचा (एरोड्रोम लायन्सस) परवाना मिळण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी एएआयनेच विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव मांडला असल्याने ते अकोला विमानतळाचे विस्तारीकरण करणार किंवा नाही, याबाबत कार्यकारी संचालकांच्या पत्रातून काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. (प्रतिनिधी)

** पत्राची प्रत पीडीकेव्हीकडे!एएआयच्या कार्यकारी संचालकांनी राज्य शासनाला पाठविलेल्या पत्राची प्रत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठालाही मिळाली आहे. कृषी विद्यापीठाला एएआयचे पत्र मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

** १00 किलोमीटरमध्ये दोन विमानतळ ठरू शकते अडचण!अकोला येथील शिवणी विमानतळापासून १00 किलोमीटरच्या आत असलेल्या अमरावती येथे बेलोरा विमानतळाची निर्मिती झाली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासन येथील विमानतळाचा विकास झपाट्याने करीत आहे. अशा परिस्थितीत अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणात अडचणी येऊ शकतात.