शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांपासून अकोला विमानतळ विस्तारीकरणाचे घोंगडे भिजतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:14 IST

२१ हेक्टर खासगी जमीन संपादनाचा प्रश्न कायमच असल्याने, गेल्या १० वर्षांपासून विमानतळ विस्तारीकरणाचे घोंगडे भिजतच पडले आहे.

अकोला: अकोल्याच्या शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ६०.६८ हेक्टर आर जमिनीचा ताबा भारतीय विमान पत्तन प्राधिकरणला देण्यात आला असला, तरी २१ हेक्टर खासगी जमीन संपादनाचा प्रश्न कायमच असल्याने, गेल्या १० वर्षांपासून विमानतळ विस्तारीकरणाचे घोंगडे भिजतच पडले आहे.अकोल्यातील शिवणी विमानतळ भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या मालकीचे असून, सध्या या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १ हजार ४०० मीटर व रुंदी ४५ मीटर आहे. या विमानतळावर ‘एटीआर-४२’ प्रकारची विमाने उतरण्याची सोय आहे. तथापि, विमानतळावर ‘एटीआर-७२’ प्रकारची विमाने उतरण्याची सोय उपलब्ध करण्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १ हजार ८०० मीटरपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव भारतीय विमान पत्तन प्राधिकरणमार्फत २५ जुलै २००८ रोजी देण्यात आला होता. विमानतळाची धावपट्टी पूर्व-पश्चिम असून, धावपट्टीच्या पूर्व बाजूने राष्ट्रीय महामार्ग असल्याने पूर्व बाजूने धावपट्टीचे विस्तारीकरण करणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने, पश्चिम बाजूने विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध असून, त्यासाठी आवश्यक असलेली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व खासगी जमीन उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही भारतीय विमान पत्तन प्राधिकरणमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार विमानतळ विस्तारीकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ६०.६८ हेक्टर आर जमीन व त्यावरील इमारती, शेततळे, विहिरी, सरोवर इत्यादींच्या मूल्यांकनापोटी ५ कोटी ६४ लाख २० हजार ३५२ रुपये कृषी विद्यापीठास वितरित करण्यास ४ मार्च २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. कृषी विद्यापीठाच्या ६०.६८ हेक्टर आर जमिनीचा ताबा २३ मे २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भारतीय विमान प्राधिकरणला देण्यात आला. त्यानंतर विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४.०६ हेक्टर आर खासगी जमीन संपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने खासगी जमीन मोजणीसाठी १५ मार्च २०१७ रोजीच्या शासन निर्देशानुसार २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. संयुक्त मोजणी अहवालानुसार विमानतळ विस्तारीकरणासाठी २१ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. खासगी जमीन संपादनाची प्रक्रिया रखडल्याने विमानतळ विस्तारीकरणाचे काम अद्याप मार्गी लागले नसल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला