शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Akola: जिल्ह्यातील कृषी सेवा प्रतिष्ठाने तीन दिवस राहणार बंद

By रवी दामोदर | Updated: October 28, 2023 20:21 IST

Akola: महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित विधायकांनुसार कृषी निविष्ठा व्यावसायिकांवर नवीन कायदे लादल्या जात आहे. त्या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच कृषी प्रतिष्ठाणे बंद ठेवण्याचा निर्णय अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाकडून घेण्यात आला आहे.

- रवी दामोदर अकोला - महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित विधायकांनुसार कृषी निविष्ठा व्यावसायिकांवर नवीन कायदे लादल्या जात आहे. त्या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच कृषी प्रतिष्ठाणे बंद ठेवण्याचा निर्णय अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी दि.२ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत असे तीन दिवस कृषी निविष्ठा केंद्र बंद राहणार आहेत. यासंदर्भात व्यावसायिक संघाकडून जिल्हाधिकाऱ्यांनापत्र देण्यात आले आहे.

अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाने कृषी निविष्ठा व्यावसायिकांबाबत विधेयक क्रमांक ४० ते ४४ नुसार नवीन कायदे लादल्या आहेत. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी या कृषी निविष्ठा व्यावसायिकांकरीता अत्यंत जाचक व अन्यायपूर्ण असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. हे कायदे लागू जाल्यास कृषी निविष्ठा व्यावसायिकांना व्यवसाय करणे अशक्य होणार असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे या कायद्यांविरोधात महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टीसाईड सीड्स डिलर्स असोसिएशनमार्फत दि.२ ते ४ नोव्हेंबर कालावधित बंद पुकारलेला आहे. या बंदला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने पाठिंबा देणार असल्याचे संघाच्या कार्यकारणीच्या बैठकीत ठरले आहे. त्यामुळे आगामी दि.२ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र बंद राहणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले असून, त्यावर अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाचे अध्यक्ष मोहन सोनवणे, सचिव डॉ. मंदार सावजी यांची स्वाक्षरी आहे. ऐन रब्बी हंगामाच्या लगबगीत कृषी निविष्ठा केंद्र बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे.

महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित विधेयकांचा निषेध म्हणुन पहिल्या टप्प्यात तीन दिवस कृषी निविष्ठा केंद्रे बंद ठेवली जाणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी सरकारच्या संपर्कात आहे. मागणी मान्य न झाल्यास अधिवेशनच्या काळात सर्व व्यावसायिक आक्रमक भुमिका घेतील.- मोहन सोनोने, अध्यक्ष, अकोला जिल्हा कृषि व्यावसायिक संघ.

टॅग्स :Akolaअकोला