शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

अमरावतीतील सेक्स स्कँडलमध्ये अकोल्याचा आरोपी

By admin | Updated: February 27, 2016 02:06 IST

देहविक्री करणा-या पाच तरुणींना अटक ; आरोपी बिल्डर अकोल्याचा.

अकोला: देहविक्री व्यवसायातील पाच तरुणींसह एक एजन्ट महिला व अकोल्याच्या एका युवकास बुधवारी सायंकाळी अमरावतीमध्ये अटक करण्यात आली. अकोल्याचा हा आरोपी युवक व्यवसायाने बिल्डर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.दोन एजन्ट महिलांनी एक महिन्यापूर्वी अमरावती येथील आनंदवाडी कॉलनीत एका तीन मजली अपार्टमेंटमध्ये भाडेतत्वावर फ्लॅट घेतला. तेथे पाच तरुणींमार्फत देहविक्रीचा व्यवसाय सुरु केला. हा प्रकार काही दिवसांपूर्वी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आला होता. देहविक्री होत असल्याची माहिती पोलीस विभागाला दोन दिवसांपूर्वीच मिळाल्याने पोलिसांनी आनंदवाडी परिसरातील या फ्लॅटवर लक्ष केंद्रीत केले. देहविक्री होत असल्याची शहानिशा झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एका पंटरला ग्राहक बनवून फ्लॅटमध्ये पाठविण्यात आले. या पंटरने महिलेशी संवाद साधून एका तरुणीची निवड केली. त्यानंतर तो फ्लॅटमध्ये शिरला. याबाबत पंटरने पोलिसांना माहिती देताच पोलिसांचा ताफा फ्लॅटमध्ये शिरला. फ्लॅटमध्ये अतुल काशीराव इंगळे (वय ३५, रा. अकोला) या तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तसेच पाच तरुणी व एक एजन्ट महिलेलासद्धा फ्लॅटमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींजवळून १५00 रुपये रोख जप्त केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. यावेळी परिसरातील बघ्यांनी गर्दी केली होती. सातही जणांना पोलिसांनी पोलीस आयुक्तालयात नेऊन, तेथे कसून चौकशी केली. चौकशीमध्ये आणखी एका एजन्ट महिलेचे नाव समोर आले असून, तिनेही फ्लॅट भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गुन्हे शाखेने पाच तरुणी, दोन एजन्ट महिला व अतूल इंगळेला गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. दुसर्‍या महिला एजन्टचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध ३,४,५, पीटा अँक्ट व भादंविच्या कलम ३७0, २,३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. गाडगेनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.