शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Akola: धमाल विनोदी सादरीकरणाने अकोलेकरांना खळखळून हसविले; फक्कड लावणीही रंगली !

By संतोष येलकर | Updated: March 10, 2024 19:22 IST

Akola News: 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील दमदार कलावंतांच्या धमाल विनोदी सादरीकरणाने अकोलेकरांना खळखळून हसविले. हास्याचे फवारे आणि महाराष्ट्राची फक्कड लावणीही शनिवारी चांगलीच रंगली. त्यामुळे अकोल्यातील महासंस्कृती महोत्सवाचा पाचवा दिवस अविस्मरणीय ठरला.

- संतोष येलकरअकोला - 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील दमदार कलावंतांच्या धमाल विनोदी सादरीकरणाने अकोलेकरांना खळखळून हसविले. हास्याचे फवारे आणि महाराष्ट्राची फक्कड लावणीही शनिवारी चांगलीच रंगली. त्यामुळे अकोल्यातील महासंस्कृती महोत्सवाचा पाचवा दिवस अविस्मरणीय ठरला.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभाग आणि अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरातील लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित महोत्सवात 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील कलावंतांनी, तसेच प्रसिध्द कलावंत मेधा घाडगे यांनी 'संस्कृती महाराष्ट्राची' हा कार्यक्रम सादर केला. यावेळी प्रामुख्याने आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुंभार आदींची उपस्थिती होती.

प्रसिद्ध मराठी कलावंत कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश शिरसाठ, अंकुर वाळवे, स्नेहल सिद्दम, रोहित चव्हाण या कलावंतांनी उपस्थितांना खळखळून हसविले. हवालदाराच्या भूमिकेत कुशल बद्रिके यांचा व पाठोपाठ गा. तु. उखाणे या भूमिकेत श्रेया बुगडे यांचा मंचावर प्रवेश होताच रसिकांच्या टाळ्यांनी प्रेक्षागृह दणाणून गेले होते.

लावण्यांनी जिंकले रसिकांना;स्थानिक कलावंतांचीही गाणी!प्रसिध्द कलावंत मेधा घाडगे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या लावण्यांनी रसिकांना जिंकून घेतले. माया शिंदे यांनी सादर केलेली 'अहो शेजारी लई दिसांनी झाली भेट' फक्कडबाज लावणीही मोठी दाद मिळवून गेली.सिंगर शीलवंत यांनी 'देवा श्रीगणेशा', 'शिवरायांची तलवार' ही गाणी गाऊन रसिकांची दाद मिळवली. नेहा यांनी 'कोंबडी पळाली', 'ही पोर साजूक तुपातली' अशी गाणी सादर करून दाद मिळवली. स्थानिक कलावंतांनीही गाणी सादर केली.

टॅग्स :Akolaअकोला