शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अकोला जिल्ह्यात रिमझिम पाऊस

By admin | Updated: October 26, 2014 00:43 IST

रब्बीसह खरीप पिकांसाठी ठरणार उपयुक्त.

अकोला: रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी पावसाची आतुरतेने प्रतीक्षा केली जात असतानाच, शनिवारी अकोल्या जिल्ह्यासह पश्‍चिम विदर्भातील अमरावती, बुलडाणा व वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. विभागातील यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. हा पाऊस रब्बी पेरण्यांसह खरीप पिकांसाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे, कृषी विभागाचे म्हणणे आहे.यावर्षी पावसाळ्यास तब्बल सव्वा महिना उशिराने झालेला प्रारंभ आणि त्यानंतरही पावसाचे कमी प्रमाण, यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद इत्यादी कमी कालावधीच्या पिकांची अत्यल्प प्रमाणात पेरणी झाली. दुसरीकडे गत काही वर्षांपासून, कापसाला मागे टाकून विभागातील प्रमुख पिकाचा मान पटकाविलेल्या सोयाबीनचे एकरी उत्पादन केवळ ५0 किलो ते एक क्विंटलपर्यंत घसरल्याने, पश्‍चिम विदर्भातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके बुडाल्याने, यंदा शेतकरी दिवाळी साजरी करू शकला नाही.खरिपातील नुकसान निदान रब्बी हंगामात तरी भरुन काढता येईल, या आशेने शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पेरणीची तयारी सुरु केली असली तरी, जमिनीत पेरणीयोग्य ओलावा नसल्याने, अद्यापही सार्वत्रिक रब्बी पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. शेतकर्‍यांना रब्बी पेरण्यांसाठी पावसाची प्रतीक्षा होती. शनिवारी सकाळपासूनच अकोला, बुलडाणा जिल्ह्यात रिमझिम पावसाने हजेरी लावली, तर अमरावती व वाशिम या दोन जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस झाला. यवतमाळसह विभागातील पाचही जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. रिमझिम पावसामुळे हरभरा, करडी आदी रब्बी पिकांच्या रखडलेल्या पेरण्या सुरू होण्याची अपेक्षा, कृषी विभागातर्फे व्यक्त केली जात आहे. हा पाऊस खरीप हंगामातील कपाशी पिकासाठीही उपयुक्त ठरणार आहे.