शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात पुन्हा १0 लाख रुपयांचा गुटखा जप्त

By admin | Updated: November 6, 2014 01:11 IST

पोलिस, अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई.

अकोला: एमआयडीसी भागातील गोडावूनमध्ये पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी दुपारी घातलेल्या संयुक्त छाप्यामध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये गुटख्यासह सुगंधित तंबाखू व पान मसाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा रात्रीपर्यंत सुरू होती. तीन ठिकाणांवरून जप्त केलेल्या गुटख्याची एकूण किंमत १0 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनातील विशेष पथकाला एमएच ३0 ए ९१३७ क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून गुटखा येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने ऑटोरिक्षाचा पाठलाग केला. हा ऑटोरिक्षा न्यू राधाकिसन प्लॉटमधील रमणकुंज अपार्टमेंटजवळ येताच पोलिसांनी ऑटोरिक्षा थांबवून त्यातील साहित्याची तपासणी केली असता, गुटख्यासह सुगंधित तंबाखूचे पाकिटे दिसून आली. ऑटोरिक्षा चालकाची चौकशी केली असता, त्याने रमणकुंज अपार्टमेंटमध्ये राहणारे हरीश केशवलाल सांगाणी यांच्या मालकीचा हा गुटखा असल्याचे सांगितले. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगाणी यांच्या फ्लॅटची झडती घेतली. फ्लॅटमध्येही पान मसाला, सुगंधित तंबाखू व सुपारीचे २२ बॉक्स मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी हरीश सांगाणी, ऑटोरिक्षा चालक संतोष पाटकर आणि विठ्ठल बुंदे यांना ताब्यात घेतले. या तिघांवर उशिरा रात्रीपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर आशिष अग्रवाल, घनश्याम अग्रवाल, वहीद खान आणि कल्लू नामक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. ही कारवाई एपीआय सचिन जाधव, परिविक्षाधिन पीएसआय ए.पी. खोडेवाड, अन्न व औषध निरीक्षक नितीन नवलकार यांनी केली.