शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अकोट तहसील कार्यालय गुल्लरघाटात पोहोचले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:30 IST

अकोट :  मेळघाटातून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या गावकर्‍यांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता २३ ऑगस्ट रोजी अकोट तहसील कार्यालयच पुनर्वसित गुल्लरघाट गावात पोहोचले. या ठिकाणी गावकर्‍यांना रेशनकार्ड, मतदार नोंदणी व संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थींची अर्ज भरुन घेण्यात आले. तसेच रेशनकार्डाचे वितरण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट :  मेळघाटातून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या गावकर्‍यांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता २३ ऑगस्ट रोजी अकोट तहसील कार्यालयच पुनर्वसित गुल्लरघाट गावात पोहोचले. या ठिकाणी गावकर्‍यांना रेशनकार्ड, मतदार नोंदणी व संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थींची अर्ज भरुन घेण्यात आले. तसेच रेशनकार्डाचे वितरण करण्यात आले.पुनर्वसित गावकर्‍यांनी मेळघाटात परत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर, तसेच या गावात विविध समस्यांमुळे सुरू असलेल्या मृत्यू तांडवाचा वृत्तांत ‘लोकमत’ने प्रकाशित करताच, प्रशासन खडबडून जागे झाले.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्रात असलेल्या गावांचे पुनर्वसन अकोट तालुक्यात करण्यात आले आहे. त्यामध्ये गुल्लरघाट, अमोना, धारगड, सोमठाणा बु., सोमठाणा खुर्द, केलपाणी या सहा गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये पुनर्वसनानंतर शासनाने पाच वर्षांंत दिलेल्या आश्‍वासनानुसार सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. मेळघाटातून आणून या भागात टाकून दिल्यागत परिस्थितीमुळे कंटाळलेल्या गावकर्‍यांनी जंगलाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला होता. वातावरण व दूषित पाण्यामुळे तसेच रोजगार नसल्याने मानसिक अस्वस्थतेत असलेल्या अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेने प्रशासन चांगलेच हादरले. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी अकोट तहसील कार्यालयच  तहसीलदार विश्‍वनाथ घुगे यांच्यासमवेत पुनर्वसित गुल्लरघाट या गावात पोहोचले. गावातील मंदिराच्या ओट्यावर या कार्यालयाचे कामकाज दिवसभर सुरू होते. या ठिकाणी गावकर्‍यांना रेशनकार्ड नाव दुरुस्ती, नवीन नावे समाविष्ट करण्यात आलीत. विशेष म्हणजे ५४ जणांची मतदार नोंदणीचे अर्ज भरून घेण्यात आले. निराधार योजनेचा लाभ देण्याकरिता श्रावणबाळ योजनेत १८, तर संजय गांधी योजनेत दोन अर्ज भरून घेण्यात आले. हे सर्व अर्ज तहसील कार्यालयात ऑनलाइन करण्यात येणार आहेत. त्याकरिता गावकर्‍यांना त्या ठिकाणी बोलाविल्या जाणार नाही. योजनेंतर्गत थेट लाभ गावातच पोहचून देण्यात येईल, असे तहसीलदार घुगे यांनी सांगितले. तसेच तहसील कार्यालयासंबंधी काही अडचणी, समस्या असल्यास पुन्हा या गावात वारंवार तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी येऊन निराकरण करतील असे सांगण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार राजेश गुरव, नायब तहसीलदार विजय खेडकर, मंडळ अधिकारी सायरे, ओळंबे, देशमुख, तलाठी चव्हाण, अव्वल कारकून कुळकर्णी, अंदुरकर, लिपिक खान, संगणक ऑपरेटर सिद्धांत वानखडे आदी उपस्थित होते.  काही आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयाच्या अधिकार्‍यांसमोर वन विभागाविषयी आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे पुनर्वसन झालेल्या गावकर्‍यांमध्ये वन विभागाने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न झाल्यामुळे चांगलाच असंतोष खदखदत असल्याचे दिसून आले.  गुल्लरघाट या गावाप्रमाणेच इतरही पुनर्वसित गावात तहसील कार्यालयाने  अधिकारी- कर्मचारी जाऊन योजनांचा लाभ देणार असल्याचे तहसीलदार घुगे यांनी सांगितले.