शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘एसबीआय’ला हवा आर्थिक मोबदला; टॉवर रस्त्याचे काम ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाने शहरातील सात सिमेंट रस्त्यांची  कामे सुरु केल्यानंतर टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकपर्यंतच्या  रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. रस्ता  रुंदीकरणासाठी मनपा प्रशासनाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या  मालकीची जागा हवी आहे.  या जागेच्या बदल्यात बँकेने मागि तलेल्या आर्थिक मोबदल्याची रक्कम जास्त असल्यामुळे ...

ठळक मुद्देरस्ता  रुंदीकरणासाठी मनपा प्रशासनाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या  मालकीची जागा हवी आहेजागेच्या बदल्यात बँकेने मागि तलेल्या आर्थिक मोबदल्याची रक्कम जास्त टॉवर चौक ते हॉटेल स्कायलार्कपर्यंत रस्त्याचे काम ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाने शहरातील सात सिमेंट रस्त्यांची  कामे सुरु केल्यानंतर टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकपर्यंतच्या  रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. रस्ता  रुंदीकरणासाठी मनपा प्रशासनाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या  मालकीची जागा हवी आहे.  या जागेच्या बदल्यात बँकेने मागि तलेल्या आर्थिक मोबदल्याची रक्कम जास्त असल्यामुळे की काय,  टॉवर चौक ते हॉटेल स्कायलार्कपर्यंत रस्त्याचे काम ठप्प झाल्याचे  चित्र आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या कालावधीत २0१३ मध्ये अतवृष्टीने  दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेला १५  कोटींचा निधी प्राप्त झाला होता. प्राप्त निधीतून एकूण १८ रस्त्यांची  दुरुस्ती हाती घेण्यात आली होती. यामध्ये प्रशासनाने सात सिमेंट  काँक्रिटीकरणाचे, तर उर्वरित ११ डांबरीकरणाचे रस्ते प्रस्तावित केले  होते. सिमेंट रस्त्यांमध्ये टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकपर्यंतच्या  रस्त्याचा समावेश होता. या रस्त्याची रुंदी केवळ १८ फूट केली  जाणार होती. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता म्हणून टॉवर  चौक-रतनलाल प्लॉट रस्त्याकडे पाहिल्या जाते. भविष्यात वाह तुकीची समस्या उद्भवणार हे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त  अजय लहाने यांनी सिमेंट रस्त्यांच्या ‘वर्किंग एस्टीमेट’मध्ये बदल  करून ते ३८ ते ४0 फूट रूंद करण्याचा निर्णय घेतला. टॉवर चौकात  रस्त्याची अरूंद जागा ध्यानात घेता रस्त्यालगतच्या स्टेट बँक ऑफ  इंडियाकडून जागेचे भूसंपादन करण्यासाठी प्रशासन सरसावले. रस्ता रुंदीकरणाला अडथळा ठरणारे व रस्त्याच्या मधोमध असलेले  धार्मिक स्थळ हटविल्यानंतर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात  होईल,अशी अपेक्षा होती; परंतु एसबीआयने जागा देण्याच्या बदल्या त आर्थिक रक्कम देण्याची मागणी करीत न्यायालयात याचिका दाखल  केली आहे. ही रक्कम जास्त असल्यामुळे प्रशासन तोडगा काढण्याच्या  प्रयत्नात असल्याची माहिती आहे. 

मनपाचा प्रस्ताव बाजूला सारला!रस्ता रुंदीकरणासाठी मनपाला एसबीआय बँकेच्या जागेची गरज  आहे. जागेच्या बदल्यात बँकेला टीडीआर देण्याचा महापालिकेचा  प्रस्ताव होता. बँकेने हा प्रस्ताव तूर्तास बाजूला सारल्याची माहिती  आहे. 

उर्वरित काम नंतर होणार!टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक रस्त्यावरील वाहतूक पाहता  एसबीआयच्या जागेचा तिढा निकाली निघेपर्यंत या मार्गावर उपलब्ध  असलेल्या रस्त्याचे बांधकाम केले जाईल. जागेचा तिढा निकाली  निघाल्यानंतर रस्त्याच्या रूंदीकरणाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार  असल्याची माहिती आहे.