शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

४४ अंश तापमानातही वातानुकूलन यंत्र बंद!

By admin | Updated: April 3, 2017 02:57 IST

सर्वोपचार रुग्णालयातील परिस्थिती; अतिदक्षता कक्षातील रुग्णांचे हाल

अकोला, दि. २- शहराचे तापमान ४४ अंशापर्यंंंत तापत असल्याने, उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना, सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात मात्र सर्व नऊ वातानुकूलन यंत्र बंद आहेत. हे यंत्र केवळ भिंतीच्या शोभा वाढवित असून, रुग्ण उकाड्याने त्रस्त होत आहेत. गत काही दिवसांपासून शहरात रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होत आहे. ४४ डिग्री सेल्सिअसपर्यंंत पारा पोहोचला असून, प्रचंड तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिक थंडपेयांचा आधार घेत आहेत. वातानुकूलन यंत्र आणि कूलर लावलेल्या ठिकाणी नागरिक विसावा घेत आहेत; परंतु सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात लावलेले वातानुकूलन यंत्र प्रचंड तापमानातही बंद आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी लावलेले वातानुकूलन यंत्र सुरू करण्याबाबत प्रशासन गंभीर दिसत नाही. गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात हलविण्यात येते. या ठिकाणी १२ खाटा असून, सभागृहात नऊ वातानुकूलन यंत्र लावलेले आहेत; परंतु यापैकी एकही वातानुकूलन यंत्र काम करीत नसल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. तापमान वाढत असल्याने, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या सोयीसाठी वातानुकूलन यंत्र आणि कूलर सुरू करायला हवे होते; परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रुग्णांना उकाड्यात उपचार घ्यावे लागत आहेत. उकाड्याचा रुग्णांना त्रास होत असतानाही रुग्णालय प्रशासन ढिम्म आहे. अतिदक्षता कक्षातील लावलेले वातानुकूलन यंत्र भिंतीची शोभा वाढवित आहेत. रुग्ण यंत्र सुरू करण्याची मागणी करतात, तेव्हा रुग्णालयाकडून यंत्र बंद असल्याचे सांगण्यात येते. अतिदक्षता कक्षातीलच रुग्णांची हेळसांड होत आहे. इतर वॉर्डांंंची परिस्थितीही काही वेगळी नाही. जळीत कक्षातील वातानुकूलन यंत्र बंदसर्वोपचार रुग्णालयातील जळीत कक्षातील रुग्णांसाठीसुद्धा वातानुकूलन यंत्र लावलेले आहेत. या कक्षात दररोज भाजलेले रुग्ण भरती होतात. त्यांच्या शरीरासाठी थंड वातावरण आवश्यक आहे. असे असतानाही जळीत कक्षातील वातानुकूलन यंत्र बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणी दोन कूलर लावण्यात आले आहेत. कूलर भंगारातगतवर्षी सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांसाठी प्रशासनाने ३0 नवीन कूलर खरेदी केले होते; परंतु हे सर्व कूलर रुग्णालयातील कानाकोपर्‍यांमध्ये धूळ खात पडून आहेत. काही कूलरची मोडतोड झाली आहे. काही कूलर नादुरुस्त आहेत. एवढेच नाही, तर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना पाणी पिण्यासाठी वॉटर कूलरसुद्धा अतिदक्षता कक्षात लावलेला आहे; परंतु हा वॉटर कूलरसुद्धा बंद आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. अतिदक्षता कक्षासोबतच वॉर्डांंंमधील बंद असलेले वातानुकूलन यंत्र दुरुस्तीसाठी सार्वजनिक विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. काही वॉर्डांंंमध्ये कूलरसुद्धा लावण्यात आले आहेत. अतिदक्षता विभागातील वातानुकू लन यंत्र लवकरच दुरुस्त करून सुरू करण्यात येतील. - डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.