शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित आकृतिबंधासाठी कृषी सहायक आक्रमक

By admin | Updated: June 22, 2017 05:14 IST

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हे आंदोलन टप्प्या-टप्प्याने करण्यात येत असून, १२ ते १४ जूनदरम्यान काळय़ा फिती लावून कामकाज १५ ते १७ जूनदरम्यान लेखणीबंद व त्यानंतर १९ जून रोजी धरणे आंदोलनानंतर कृषी सहायकांनी बुधवार, २१ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला.कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंधाबाबत अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, तसेच पदे वर्ग करण्याला कृषी सहायकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यानुसार संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी सात टप्प्यांत आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येऊन काळी फीत लावून निषेध व्यक्त करण्यात आला होता. लेखणीबंद आंदोलनदेखील करण्यात आले. आंदोलनातील तिसर्‍या टप्प्यानुसार १९ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात बुधवारी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश लांडे, कार्याध्यक्ष संजय पातोंड, सचिव कमलसिंग जाधव, कोषाध्यक्ष रवींद्र माळी यांच्या नेतृत्वात जिल्हय़ातील कृषी सहायकांनी साखळी उपोषणास सुरुवात केली. सदर साखळी उपोषण २३ जूनपर्यंंत सुरू राहणार आहे. सुधारित आकृतिबंध तातडीने तयार करावा, कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १00 टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी, कृषिसेवक पदाचा तीन वर्षांंचा कालावधी शिक्षणसेवकांप्रमाणे आश्‍वासित प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावा, आंतरविभागीय बदल्या नियमित व्हाव्या, या मागण्यांचे निवेदन यावेळी संघटनेतर्फे देण्यात आले आहे. उपोषण मंडपात जिल्हाभरातून आलेले कृषी सहायक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.