शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

अँग्रोटेक २0१७ : राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात कीड व्यवस्थापनावर होणार मंथन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:50 IST

कृषी क्रांतीचे प्रणेते स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री स्व. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन (अँग्रोटेक २0१७) चे आयोजन विद्यापीठ क्रीडांगण येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते २७ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता संपन्न होईल.

ठळक मुद्देस्व. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त ‘अँग्रोटेक २0१७’ चे आयोजनबुधवार, २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते होणार उद्घाटनकीड, रोग नियंत्रणावर होणार चर्चासत्रे; शेतकर्‍यांच्या शंकांचे करणार निरसन२७ ते २९ डिसेंबर दरम्यान सकाळी १0 ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने  शिक्षण आणि कृषी क्रांतीचे प्रणेते स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री स्व. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन (अँग्रोटेक २0१७) चे आयोजन विद्यापीठ क्रीडांगण येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते २७ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता संपन्न होईल.याप्रसंगी राज्याचे गृहराज्यमंत्री व अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती राहील. तसेच अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ.डॉ. संजय रायमुलकर, आ. अमित झनक, आ. गोवर्धन शर्मा, आ. श्रीकांत देशपांडे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. बळीराम सिरस्कार, जिल्हा परिषद कृषी सभापती माधुरी गावंडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य गोपी ठाकरे, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ तथा विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. चारुदत्त मायी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांचीसुद्धा उपस्थिती राहील. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणार्‍या सोहळ्यात प्रदर्शनाचे उद्घाटन सोबतच संवादिनी-२0१८ चे विमोचनसुद्धा होणार आहे.

कीड, रोग नियंत्रणावर चर्चासत्र उद्घाटनानंतर दुपारी २.३0 वाजता प्रतिभा साहित्यिक संघाचे अध्यक्ष विठ्ठल कुलट हे कृषीविषयक काव्यपर प्रबोधन करणार आहेत, तर दुपारी ३.३0 वाजता कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या अध्यक्षतेत आयोजित चर्चासत्रात कापूस, तूर व हरभरा पिकांमधील कीड व रोग नियंत्रण तसेच पीक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, या ज्वलंत विषयावर कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे मार्गदर्शन करणार आहेत. तीनही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १0 ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.   

टॅग्स :Agrotech 2017 Akolaअ‍ॅग्रोटेक २0१७ अकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ