शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यासाठी आता कृषी समाधान शिबिर!

By admin | Updated: July 15, 2017 01:37 IST

पालकमंत्र्यांची अभिनव संकल्पना : १८ व २० जुलै रोजी आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तालुकानिहाय घेतलेल्या समाधान शिबिरांमुळे नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून, उर्वरित प्रश्नाचा पाठपुरावा स्वत: पालकमंत्री करीत आहेत. या शिबिराांची उपयुक्तता अधोरेखित झाल्यामुळेच आता कृषी क्षेत्राच्या संदर्भाने विशेष समाधान शिबिर घेण्याची संकल्पना पालकमंत्र्यांनी हाती घेतली आहे. येत्या १८ व २० जुलै रोजी हे शिबिर होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत, शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना थोडाही त्रास होऊ नये यासाठी समाधान शिबिरांच्या धर्तीवर आता हे कृषी समाधान शिबिर होत आहेत. या शिबिरामध्ये खते, बी-बियाणे, कीटकनाशके, निविष्ठा तसेच फळबाग, केळी उत्पादन गट, शेततळे या संदर्भातील काही तक्रारी असल्यास तत्काळ निराकरण करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात १८ आणि २० जुलै रोजी ही शिबिरे पार पडणार आहेत़. या शिबिरामध्ये कृषी खात्याचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत़ यावर्षी वरुण राजाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातुर असताना त्याला आपल्या कामासाठी शासन दरबारी कोणतेही खेटे घालावे लागू नयेत, त्याचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली निघावेत, शासनाच्या विविध योजनांची त्याला माहिती मिळावी, संबंधित अधिकाऱ्यांकडून या बाबत सविस्तर मार्गदर्शन व्हावे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले असून, शुक्रवारी कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रारींचा तत्काळ निपटारा होणार !मंगळवार १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता पंचायत समिती सभागृह अकोट येथे अकोट आणि तेल्हारा तालुका तसेच १८ जुलै रोजीच दुपारी २ वाजता बाळापूर आणि पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाळापूरच्या खविसं सभागृहात या शिबिराचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. गुरुवार २० जुलै रोजी सकाळी १० वाजता अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात तर याच दिवशी दुपारी २ वाजता मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मूर्तिजापूर येथे हे शिबिर घेण्यात येणार आहे़कृषीच्या संदर्भात येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण जागेवरच करण्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी कार्यालयामध्ये द्याव्यात तसेच शिबिरामध्येही आपले प्रश्न मांडावेत, कृषी अधिकाऱ्यांना या संदर्भात निर्देश देण्यात आले असून, सर्व अधिकारी शिबिरात उपस्थित राहतील.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री