शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात साकारणार अँग्रो इको टुरिझम!

By admin | Updated: February 13, 2016 01:48 IST

डॉ.पंदेकृविच्या सीआरएसने पाठवला कुलगुरूकडे प्रस्ताव.

राजरत्न सिरसाट/अकोला : अकोल्यात बहुविध अँग्रो इको टुरिजम केंद्र असावे, यासाठीचा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मध्यवती संशोधन केंद्राने(सीआरएस) या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्याकडे सादर केला आहे. पर्यावरण पुरक या पार्कसाठी ४ कोटी रू पये खर्च अपेक्षित असून, लवकरच हा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात आले होते. तथापि ही जागा विमानतळ धावपट्टीच्या विस्तारात जात असल्याने कृषी विद्यापीठाने नव्याने पयार्य शोधला असून, मत्स्य विभागाच्या १९ हेक्टर जागवेर अँग्रो टुरीजम सेंटर निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. मत्स्य विभागाच्या जागेवर घनदाट झाडे असून, या ठिाकणी मोठ,मोठी तळी आहेत. या ठिकाणाहून नाला वाहतो,घनदाट झाडे असल्याने या भागात हरण व इतर तत्सम प्राणीदेखील वावरतात. म्हणूनच कृषी विद्यापीठाने अँग्रो इको टुरीजम केंद्रासाठी या जागेची निवड केली आहे.या जागेवर मुलांना खेळण्यासाठी व महिलांसाठी स्वतंत्र पार्क तसेच ज्येष्ठ नागरिकांना आपला वेळ मजेत घालवता यावा याकरिता ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील स्वतंत्र पार्क करण्यात येईल. या भागात वन्यप्राणण्यांची चहलपहल असल्याने जंगल सफारी चा आनंद पर्यटकाना लुटता यावा यावर देखील विचार करण्यात आला आहे. या ठिकाणी मत्स्य व इतर मोठे तळे , नाला असल्याने बोटींगची व्यवस्था निर्माण करण्यात येईल. अकोला व नजिकच्या पर्यटक,चाकरमान्यांना सुटीच्या दिवशी आंनद लुटण्यासाठी एकही स्थळ नसल्याने हाच विचार करू न कृषी विद्यापीठाने अँग्रो इको टुरिजम सेंटरचही कल्पला मांडून या प्रकल्पाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार आहे.जंगल सफारी, बोटींग व्यवस्थेवर देणार भरमत्स्य विभागाच्या जागेवर जंगल असून, अनेक नागमोडी वळण आहेत. मोठय़ा आकराचे तलाव असल्याने येथे बोटींग शक्य असून,जंगल सफारीसाठीची सोय करता येणार आहे.पर्यटकांना मत्स्य संशोधन व संवर्धनाची माहिती येथे मिळणार आहे.