शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनाची तफावत भरू न काढण्यावर कृषी विभागाचा भर!

By admin | Updated: April 24, 2017 02:00 IST

अकोला: पश्चिम विदर्भात यावर्षी खते व बियाण्यांचा मुबलक साठा असून, आता उत्पादनाची तफावत भरू न काढण्यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

अकोला: पश्चिम विदर्भात यावर्षी खते व बियाण्यांचा मुबलक साठा असून, आता उत्पादनाची तफावत भरू न काढण्यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. वऱ्हाडातील शेतातील कर्बाचे प्रमाण घसरले असून, त्याचा परिणाम उत्पादकतेवर होत असल्याने उपाययोजना करण्यावर भर द्यावा लागणार आहे. दरम्यान, ७ हजार ७५ कोेटी पीक कर्जाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत २० टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.पश्चिम विदर्भात खरीप हंगामाचे जवळपास ३२ लाख हेक्टर क्षेत्र असून, यामध्ये १६ लाख हेक्टर सोयाबीनचे आहे. कापसाची पेरणी यावर्षी जवळपास ९ लाख हेक्टरपर्यंत होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार मागच्या वर्षी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन झाले आहे. सोयाबीनचे उत्पादन सरासरी हेक्टरी १२ ते १४ क्विंटल झाले हे उत्पादन कमी असून, हेक्टरी ३० क्विंटलपर्यंतचा उतारा येऊ शकतो, असा कृषी विभागाने अभ्यास केला आहे. त्यादृष्टीनेच यावर्षी पावले उचलण्यात आली असून, येत्या २८ मे ८ जूनपर्यंत पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कृषी विभागाच्यातर्फे याबाबत प्रबोधन व मार्गदर्शन केले जाणार आहे.शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य तपासून शेती करावी म्हणजे अनावश्यक खर्च टळेल व उत्पादन भरपूर घेता येईल या करिता शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात १६ लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करायचे आहे त्यातील आतापर्यंत ११ शेतकऱ्यांना लाख मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे. उत्पादनातील तफावत भरू न काढण्यासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल, त्या दृष्टीने कृषी विभागाने पाऊल उचलले आहे. पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे. सरासरी उत्पादनातील तफावत भरू न काढण्यासाठी यावर्षी भर देण्यात आला आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. २८ मे ८ जून या सप्ताहात शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे.शु.रा. सरदार, विभागीय कृषी संयुक्त संचालक, अमरावती.