शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आता कृषी केंद्र रडारवर!

By admin | Updated: July 16, 2017 02:32 IST

हरभरा बियाणे घोटाळा; अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे कारवाईचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकर्‍यांसाठी अनुदानावर दिलेल्या बियाण्यापोटी लाखोंचा मलिदा जिल्ह्यातील महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभकोच्या वितरकांसह कृषी सेवा केंद्र संचालकांनीच लाटल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बियाणे कंपन्यांनी वितरकांना क्लीन चिट देत मोकाट सोडले होते. तर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या कारवाईतही केंद्र संचालकांना सूट देण्यात आली. आता अमरावती विभागीय कृषी सहसंचालकांच्या पथकाने केलेल्या चौकशी अहवालानुसार दोन्ही स्तरावर कारवाई करावीच लागणार आहे.हरभरा बियाणे घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कृषी विभागाच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. शेतकरी आणि महाबीजच्या ५१ डीलर्सनी वाटप केलेल्या शेकडो कृषी केंद्रांची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून शासनाने रब्बी हंगामात पेरणीसाठी हरभरा बियाण्याला अनुदान दिले. महाबीज, कृभको आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाला अनुदानित दरावर बियाणे बाजारात उपलब्ध करण्यासाठी पुरवठा आदेश दिला; मात्र त्या बियाण्यांचे वाटप अनुदानित दरावर करावे, याबाबतच्या स्पष्ट सूचना महाबीजने ९ ऑक्टोबरपर्यंंतही डीलर आणि कृषी सेवा केंद्र संचालकांना दिल्याच नव्हत्या. त्यामुळे २४ सप्टेंबरपासून मिळालेल्या हजारो क्विंटल हरभरा बियाणे किमतीचा मलिदा महाबीजचे डीलर, कृषी सेवा केंद्र संचालकांनी लाटल्याचे अनेक प्रकार घडले. अकोला जिल्हय़ात १२ हजार क्विंटलपेक्षाही अधिक बियाणे वाटपात सुरुवातीला प्रचंड धांदल असल्याचा मुद्दा ह्यलोकमतह्णने लावून धरला होता. त्यामुळेच आधी केवळ सहा ते सात कृषी केंद्रांना बियाणे वितरण केल्याचे सांगणार्‍या डीलरनी दोन महिन्यांनंतर तब्बल ५0 पेक्षाही अधिक कृषी केंद्रांची यादी तपासणीसाठी कृषी विभागाला दिली. त्या सर्व केंद्रातून वाटप झालेल्या बियाण्यांचा शोध जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, दोन उपविभागीय कृषी अधिकारी, दोन तांत्रिक अधिकार्‍यांच्या पथकाने चौकशी केली आहे. त्यांचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालकांसह जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला. संबंधित कृषी केंद्र संचालकांनी शासनाच्या अनुदानित बियाणे वाटपात दिशाभूल करून फसवणुकीचा प्रकार घडला आहे. तसेच शेतकर्‍यांना देय बियाणे अनुदानाच्या रकमेवर डल्ला मारला. फसवणुकीचा हा प्रकार फौजदारी गुन्ह्यात मोडणारा आहे. परवान्यावर कारवाई कृषी विभाग करणारज्या कृषी केंद्र संचालकांनी शासनाच्या अनुदानित बियाणे वाटपात शेतकरी आणि शासनाचीही फसवणूक केली, त्यांच्या परवान्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे शिफारशीसह अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे आधी चौकशीदरम्यान, अंधारात चाचपडणार्‍या कृषी विभागाकडे आता स्पष्ट अहवाल मिळणार आहे. त्यानुसार परवानाधारकांवर आता निश्‍चितपणे कारवाई होणार आहे.महाबीजची चौकशीही तोंडघशीमहाबीजनेही आधी केलेल्या चौकशीत त्यांच्या वितरकांना सूट देत केवळ एका वितरकाला सहा महिन्यांसाठी निलंबित केले होते. त्यातून महाबीजने इतरांवर दाखलेली ह्यदयाह्ण मायेपोटी असल्याचे कृषी विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले. याप्रकाराने महाबीजला शासनाच्या अनुदानाला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.