शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान गावागावात पोहोचवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 15:39 IST

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विकसित संशोधन, तंत्रज्ञान विदर्भातील गावा-गावात पोहोचविण्याचा संकल्प कृषी विद्यापीठाने केला आहे.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विकसित संशोधन, तंत्रज्ञान विदर्भातील गावा-गावात पोहोचविण्याचा संकल्प कृषी विद्यापीठाने केला आहे. शास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांचा यात सहभाग राहणार असून, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कृषी विद्यापीठाने १६९ विविध पिकांचे वाण, १ हजार पाचशेच्यावर तंत्रज्ञान विकसित केले आहे. शाश्वत शेतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे संशोधन, तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविण्याची गरज आहे. या अनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या स्थापनेच्या ५० व्या वर्षानिमित्त या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञान, संशोधनाचा वापर करावा, यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. गावा-गावात सरपंच मेळावे घेतले जाणार आहे. ज्या गावात मेळावा घेण्यात येईल तेथे प्रत्येक शेतकºयांची घरी भेटी देऊन पीक पद्धतीनुसार मार्गदर्शन केले जाणार आहे. शेतकºयांना कृषी विद्यापीठाची कृषी संवादिनी, दैनंदिनीचे वितरण करण्यात येणार आहे. प्रगतिशील शेतकºयांचा परिसंवाद घेण्यात येणार असून, त्यांच्या प्रेरणादायी यशकथा शेतकºयांना सांगण्यात येणार आहेत.यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातंर्गत सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी, कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांचा सहभाग राहणार आहे. हे सर्व विदर्भातील गावा-गावात भेटी देणार आहे. मातीच्या आरोग्यपत्रिकेनुसार पीक घ्यावे, जमिनीची पोत सुधारावी, सूक्ष्म अन्नद्रव्य आदीचा वापर कसा वाढवावा, हे देखील शेतकºयांना समजावून सांगितले जाणार आहे. या कामी कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. शाश्वत शेती विकासासाठी या सुवर्णमहोत्सवी वर्षात यावर्षी अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी केली असल्याची माहिती कृषी शिक्षण, विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी दिली.

 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोला