शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाच्या जमिनीचा सात - बारा शासनाच्या नावे!

By admin | Updated: October 2, 2015 02:21 IST

अकोला येथील शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली जमीन शासनाच्या नावे करण्यात आली.

अकोला: अकोल्याच्या शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ६0.६८ हेक्टर जमीन शासनाच्या नावे करण्यासाठी या जमिनीचा ७/१२ गुरुवारी शासनाच्या नावे करण्यात आला.शिवणी विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठाची आवश्यक असलेली ६0.६८ हेक्टर जमीन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या ताब्यात देण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे. त्यानुषंगाने कृषी विद्यापीठाची जमीन शासनाच्या नावे करून, आणि या जमिनीचा सात-बारा शासनाच्या नावे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी उपजिल्हाधिकारी (विशेष भूसंपादन), अकोल्याचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुषंगाने महसूल विभागामार्फत कृषी विद्यापीठाच्या ६0.६८ हेक्टर जमिनीच्या ७/१२ मध्ये फेरफारची नोंद घेण्यात आली असून, विद्यापीठाच्या या जमिनीचा ७/१२ शासनाच्या नावे करण्यात आला. यासंबंधीचा अहवाल गुडधी येथील तलाठय़ामार्फत गुरुवारी अकोला तहसीलदारांकडे सादर करण्यात आला. तहसीलदारांकडून हा अहवाल शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी कृषी विद्यापीठाची शासनाच्या नावे करण्यात आलेली ही जमीन भारतीय विमानपत्तन प्राधिकरणच्या ताब्यात दिली जाणार आहे.