शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

कृषी विद्यापीठाचा जैविक कीडनियंत्रण घटक उत्पादनावर भर!

By admin | Updated: January 25, 2016 02:07 IST

उत्पादन वाढविण्यासाठी शेतकर्‍यांना दिले जाणार नि:शुल्क प्रशिक्षण.

अकोला: पर्यावरण प्रदूषण कमी करण्याकरिता, विषारी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करुन शेतकर्‍यांना ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीच्या दृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्यावतीने जैविक कीड नियंत्रण घटक उत्पादन वाढीवर भर देण्यात येत असून, या घटकाच्या उत्पादन वाढीसाठी विदर्भातील शेतकर्‍यांना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. खरीप, रब्बी पिकांवर अनेक नवीन किडींचा प्रादुर्भाव अलीकडे वाढला असून, यातील घाटेअळी विषाणू, ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटक व क्रायसोपा व ढाल या परभक्षी जैविक घटकांचे उत्पादन व हे जैविक कीड नियंत्रक वापरण्यासंबधी अकोला, अमरावती,यवतमाळ, वाशिम व बुलडाणा जिल्हय़ातील शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुरुवारपासून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली असूून, तीन-तीन शेतकरी गटांना हे प्रशिक्षण २ फेब्रुवारीपर्यंत दिले जाणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचे वैयक्तिक लक्ष असून, ते स्व:त उपस्थित राहून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. विदर्भातील तूर, कापूस, हरभरा, सोयाबीन व भाजीपाला पिकांवरील किडींचे जैविक पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने घाटे अळीविषाणू, ट्रायकोग्रामा परोपजीवी कीटक तसेच क्रायसोपा या परभक्ष्यी कीटकांची प्रयोगशाळेत निर्मिती व त्यांचा पिकामध्ये वापर व इतर इत्थंभूत माहिती प्रत्यक्ष उत्पादन तंत्राच्या अनुभवातून शेतकर्‍यांना या प्रशिक्षणात देण्यात येत आहे. किडींची अंडी व सुरुवातीच्या अळी अवस्थेतच किडींचा समूळ नायनाट करण्याकरिता व दीर्घकाळ प्रभावी अशा जैविक घटकांच्या माध्यमातून कीड व्यवस्थापन करणे अत्यंत सोपे, सरळ व कमी खर्चाचे असल्याचे शेतकर्‍यांना या प्रशिक्षणाद्धारे अनुभवास येत आहे. विभागीय कृषी सहसंचालक अमरावती व जिल्हा आत्मा संस्थेच्या सहयोगाने हे मोफत प्रशिक्षण डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठात देण्यात येत आहे.