शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठ कर्मचाºयांचा दोन महिन्यापासून संप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 14:07 IST

‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांचे रोजंदारी कर्मचारी गत दोन महिन्यापासून संपावर गेले असून, २५ दिवसांपासून कर्मचाºयांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यातील तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने मागील आठवड्यात त्यांना सर्वोपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांच्या जागी नीळकंठ जवळकर व मारोती खिल्लारे उपोषणाला बसले असून,त्यांची प्रकृती खालावत आहे.

ठळक मुद्देआमरण उपोषण सुरू ;कर्मचाºयांची प्रकृती खालावली

अकोला : ‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांचे रोजंदारी कर्मचारी गत दोन महिन्यापासून संपावर गेले असून, २५ दिवसांपासून कर्मचाºयांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यातील तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने मागील आठवड्यात त्यांना सर्वोपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांच्या जागी नीळकंठ जवळकर व मारोती खिल्लारे उपोषणाला बसले असून,त्यांची प्रकृती खालावत आहे.कृषी विद्यापीठाच्या रोजदांरी कर्मचाºयांनी संप पुकारल्याने खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.मूग,उडिदाचे पीक हातचे गेले असून, आता कापूस, तूर व इतर पिकांवर परिणाम झाला आहे. खरीपानंतर रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे.पण कर्मचाºयांच्या मागण्यावर अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचाºयांनी आंदोलन तीव्र केले आहे. चाचणीसाठी पेरणी करण्यात आलेल्या देशी बीटी कापसाचेही नुकसान झाले आहे. किटकनाशकांची फवारणी केली नसल्याने या पिकावर किडींचा प्रादुर्भावही झाला आहे. ठिबकव्दारे या पिकाला पाणी देण्यात येत होते तेही अनेक दिवसापासून बंद असल्याने हे पीक वाळण्याच्या स्थितीत आहे. संपाचा परिणाम म्हणून कृषी विद्यापीठाचे अधिकारी,शास्त्रज्ञांना रात्रीची गस्त घालावी लागत आहे. पण सर्वच ठिकाणी अधिकारी फिरू शकत नसल्याने कृषी विद्यापीठात चोºया वाढल्या आहेत या कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. विलास भाले मागील आठ दिवसापुर्वी रू जू झाले आहेत. कुलगरू रू जू झाल्यानंतर तोडगा निघेल अशी कर्मचाºयांना अपेक्षा होती पण अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही..दरम्यान, मागील २५ दिवसापुर्वी कुसूम देवानंद कांबळे, काशीनाथ मेश्राम, रमेश चके्र हे उपोषणाला बसले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सर्वोपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यांच्या जागी नीळकंठ जवळकर व मारोती खिल्लारे हे मंगळवारपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृतीही खालावत आहे.