शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कृषिउत्पन्न बाजार समित्यातून अडत होणार हद्दपार?

By admin | Updated: August 16, 2015 23:51 IST

अहवाल सुपूर्द ; लवकरच निर्णय होण्याची शक्यता.

अकोला : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यातून शेतमालावर वसूल करण्यात येणारी अडत आता रद्द होण्याची शक्यता असून, लवकरच याबाबतीत निर्णय होणार असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल शुक्रवारी शासनाला दिल्यानंतर शेतकर्‍यांचे लक्ष आता शासनाच्या निर्णयाकडे लागले आहे. राज्यातील बाजार समित्यामध्ये शेतकर्‍यांनी विक्रीला आणलेल्या मालावर शेकडा टक्केवारीने अडत वसूल करण्यात येत असून, तोलाई, हमाली, चाळण धान्याची स्वच्छता करणे इत्यादींची बिदागीही शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या रकमेतूनच वसूल केली जाते. शेतकर्‍यांची यामधून सुटका करण्याचा निर्णय तत्कालीन पणन संचालक सुभाष माने यांनी घेतला होता. या निर्णयाला राज्यातील खरेदीदार संघाने विरोध दर्शवित बाजार समित्या बंद ठेवल्या होत्या. त्यानंतर शासनाने एका समितीचे गठण केले होते. या समितीने शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी आपला अहवाल सहकार मंत्रालयाकडे सादर केला आहे. या अहवालात काय म्हटले आहे. हे अद्याप बाहेर आले नसले तरी हा अहवाल शेतकर्‍यांच्या बाजूनेच असेल, अशी अपेक्षा बाजार समिती तज्ज्ञांना आहे. वर्तमान स्थितीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेकडा ३ टक्के याप्रमाणे शेतकर्‍यांच्या मालावर अडत लावली जात आहे. हमाली १0 रुपये व तोलाई २ रुपये धरू न ही रक्कम जवळपास १0२ ते १0५ रुपये आणि इतरही अनेक प्रकारचे देय आकारले जाते. म्हणजेच ९ हजार रुपये क्विंटल तुरीचे दर असतील तर ३ टक्केप्रमाणे शेतकर्‍यांना २७0 रुपये अडत मोजावी लागते. अवर्षणस्थिती, उत्पादन घटल्यास ही अडत देणे शेतकर्‍यांना कठीणच आहे. म्हणूनच शेतकर्‍यांकडून अडत वसूल न करता या अडतची व्यवस्था खरेदीदार किंवा शासनाने अन्यत्र स्रोतातून करण्याची मागणी होत आहे.