शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कृषी शिक्षण ग्रामीण भागात पोहोचविणार -कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:03 IST

अकोला : शेती विकासाच्या कार्यक्रमासोबतच कृषी शिक्षणाची  गंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार  असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी गुरुवारी केले. 

ठळक मुद्देकृषी विद्यापीठातर्फे डॉ.भाले यांचा सपत्नीक सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेती विकासाच्या कार्यक्रमासोबतच कृषी शिक्षणाची  गंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार  असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी गुरुवारी केले. कृषी विद्यापीठ प्रशासनातर्फे आयोजित  कार्यक्रमात सत्काराला  उत्तर देताना डॉ. भाले बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी  कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर होते.  या प्रसंगी विचार मंचावर सत्कारमूर्ती डॉ. विलास भाले, त्यांच्या  सुविद्य पत्नी कीर्ती भाले, माजी कुलगुरू डॉ. गोविंदराव भराड   यांच्यासह कृषी अभियांत्रिकीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महेंद्र  नागदेवे, सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण डॉ. विलास खर्चे,  सहयोगी अधिष्ठाता वनविद्या महाविद्यालय डॉ. ययाती तायडे,  सहयोगी अधिष्ठाता उद्यानविद्या महाविद्यालय डॉ. प्रकाश नागरे,  विद्यापीठ नियंत्रक  विद्या पवार, विद्यापीठ अभियंता आर.पी.  खोडकुंभे, बुलडाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  प्रमोद  लहाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. भाले  यांनी शिक्षण, विस्तार, संशोधनाशी निगडित विषयावर विवेचन  करताना, सामाजिक बांधीलकी हा धर्म असला पाहिजे असे  म्हणाले. या कृषी विद्यापीठाने शेती आणि शेतकरी विकास  डोळ्य़ासमोर ठेवून आजपर्यंतचे नियोजन केले आहे. त्याचाच  परिपाक म्हणून आजवर ५0 हजारांहून अधिक कृषी  पदविकाधारक, ३0 हजार कृषी पदवीधर आणि जवळपास नऊ  हजार पदव्युत्तर, आचार्य निर्माण केले आहेत. कृषी, शेती  विकासास त्यांचा अनुकूल हातभार लागत आहे. या कृषी विद्या पीठाने आजपर्यंत  १६0 पीक वाण, १,२0७ शेती विकास,  तंत्रज्ञानाच्या शिफारशी देशाला दिल्या आहेत. कृषी विद्या पीठाकडे सर्वांच्याच नजरा असून, येणारा काळ बघता कृषी  विद्यापीठांची जबाबदार अधिक वाढली आहे. राज्यपाल, मु ख्यमंत्री आणि  कृषिमंत्र्यांनी या  कृषी विद्यापीठाची धुरा  माझ्याकडे सोपविली आहे. आपणा सर्वांना सामूहिकरीत्या या  जबाबदारीची जाणीव ठेवून आगामी काळात एकजुटीने काम  करू न शाश्‍वत शेती विकास घडवून आणायचा आहे. कृषी  शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात रुजवायची आहे, असा मनोदय  त्यांनी व्यक्त केले.