शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

‘ईईएसएल’सोबत करार; महापालिकेच्या डोक्याला ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:23 IST

मागील महिनाभरापासून पथदिवे लावण्यासाठी कंपनीकडे पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे.

- आशिष गावंडे

अकोला: मोठा गाजावाजा करत सत्ताधारी भाजपने ६ मार्च रोजी ‘ईईएसएल’ कंपनीसोबत एलईडी पथदिवे लावण्याचा करारनामा केला. ज्या दिवशी करारनामा केला त्याच दिवशी घाईघाईत प्रभाग क्रमांक १२ मध्ये पथदिव्यांचे उद्घाटनही आटोपण्यात आले. मागील महिनाभरापासून पथदिवे लावण्यासाठी कंपनीकडे पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले असून, या प्रकारामुळे महापालिकेच्या डोक्याला नवीनच ताप लागल्याचे बोलल्या जात आहे.एलईडीचा लख्ख उजेड व त्यामुळे विजेची होणारी बचत ध्यानात घेता महापालिका स्तरावर एलईडी पथदिवे लावण्यासाठी नगर विकास विभागाने केंद्र शासन प्रमाणित ‘ईईएसएल’ (एनर्जी एफिसीएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) कंपनीची निवड केली. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये ईईएसएल कंपनीला पथदिवे उभारणीचा कंत्राट देण्यात आला आहे. मनपा क्षेत्रातील पथदिव्यांची एकूण संख्या, त्यावर खर्च होणारी वीज व त्या बदल्यात मनपाला प्राप्त होणारे वीज देयक आदी मुद्दे लक्षात घेता कंपनीसोबत करार करण्यात आला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी करारनामा मंजूर करण्याची सत्ताधाऱ्यांना घाई होती. त्यानुषंगाने ६ मार्च रोजी महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात महापालिका आयुक्त संजय कापडणीस व कंपनीच्या प्रतिनिधींनी करारनाम्यावर स्वाक्षºया केल्या. त्यावेळी मनपातील सर्व पदाधिकारी व काही नगरसेवक उपस्थित होते.घाईघाईत उद्घाटनही केले!महापौरांच्या दालनात कंपनीसोबत करार होताच त्याच दिवशी सायंकाळी प्रभाग क्रमांक १२ मधील लोहिया जीन येथे आमदार गोवर्धन शर्मा, महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक अजय शर्मा यांच्या उपस्थितीत एलईडीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतरही कामाची गती अशीच राहील, ही अपेक्षा फोल ठरली आहे.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला