शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कृषिदूत पोहोचवणार शेतक-यापर्यंत कृषितंत्रज्ञान !

By admin | Updated: May 23, 2016 01:33 IST

एकीकृत कीड व्यवस्थानावर भर; डॉ. पंदेकृविने दिले प्रशिक्षण.

अकोला: पश्‍चिम विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये कृषिदूत योजना राबविण्यात येत असून, शेतकर्‍यांना नवकृषितंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती शेतकर्‍यांना गावपातळीवर देण्यात येणार आहे. याकरिता १७0 कृषिदूतांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यावर्षी प्रशिक्षण दिले. या योजनेसाठी गावातील युवकांची निवड करण्यात आली आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. या पृष्ठभूमीवर रतन टाटा ट्रस्टच्यावतीने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषिदूत योजना सुरू करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञानाचे अवलोकन करू न ते तंत्रज्ञान आपल्या गावातील शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात कृषिदूत महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे कमी खर्चाच्या शाश्‍वत तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसार मोठय़ा प्रमाणात होत आहे. अशाप्रकारे कृषिदूतांनी कापूस, तूर, सोयाबीन पिकांवरील शेतकर्‍यांचा प्रतिएकरी होणारा खर्च कमी केला असून, उत्पादनवाढीसाठी जोरकस प्रयत्न करण्यात येत आहेत. यावर्षी पश्‍चिम विदर्भातील बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, नेर, मोर्शी आणि धारणी या गावांचे क्लस्टर तयार करण्यात आले आहे. पाच जिल्ह्यांत जवळपास २५0 कृषिदूत गावपातळीवर काम करणार आहेत. कृषिदूतांना जी गावे दिली आहेत, त्या गावांच्या शिवारातील शेतीसंदर्भात येणार्‍या अडचणी ते सोडवण्याचे प्रयत्न करणार आहेत. याबाबत ते कृषी विद्यापीठाच्या संपर्कात असतील. कृषिदूतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रक्षेत्र अधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सर्व कृषिदूत हे मानधनावर काम करीत आहेत.