शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात व्यापारी संकुलात अग्नितांडव

By admin | Updated: March 21, 2017 02:55 IST

गांधी रोडवरील उत्सव संकुलमध्ये (आरआरसी संकूल) अचानक आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

अकोला, दि. २0- गांधी रोडवरील उत्सव संकुलमध्ये (आरआरसी संकूल) अचानक आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या भीषण आगीत दैनीक सिटी न्युज सुपरफास्टचे कार्यालय, आरआरसी न्यूजचे कार्यालय, वाईन बार, ज्वेलर्स, झी महासेल, अ‍ॅडीओ कॅसेटचे प्रतिष्ठान व दोन मोबाईल शॉपीसह कापडाच्या दुकानातील साहित्य जळाले. यामध्ये या प्रतिष्ठान संचालकांची तब्बल ४० ते ५० लाख रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मनपाच्या अग्निशमन दलाच्या 4 वाहनाद्वारे आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास या भिषन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.गांधी रोडवर बंडु देशमूख यांच्या मालकीचे उत्सव संकुल असून या संकूलला सोमवारी पहाटे अचाणक आग लागली. या आगीत बंडु देशमूख यांच्या मालकीचे आर आर सी न्युज चॅनेलचे कार्यालय, सिटी न्युज सुपरफास्ट दैनिकाचे कार्यालय, विजय माळोकार यांच्या मालकीचे हॉटेल गिरीराज पॅलेस, 2 ज्वेलर्स, 2 मोबाईल शॉपी, कापडाचे दुकान, वाईन बारमधील साहित्य जळून खाक झाले आहे. या सर्व प्रतिष्ठानाना आग लागल्याने मोठया प्रमाणात मालमत्तेची हाणी झाली. या आगीत सर्व कार्यालय आणि प्रतिष्ठानामधील लाखो रुपयांचे साहित्य जळाले असून आर आर सी चॅनेल व दैनिकाच्या कार्यालयातील संगनक आणि यंत्रसाहित्यही आगीच्या भीषण तांडवात भक्ष्यस्थानी पडले आहे. या आगीची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या 4 वाहनांद्वारे प्रयत्न करण्यात आले. तब्बल 7 बंब पाणी रिचवून आग विझविण्यात आली मात्र पहाटे लागलेली आग विझविण्यासाठी यंत्रणेला तब्बल दुपारी १२ वाजेल्याची माहिती आहे.गांधी रोडवरील वाहतूक बंदउत्सव संकुलमध्ये लागलेल्या आगीमुळे गांधी रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली होती, तसेच या परिसरातील बाजरपेठहि काही वेळ बंद ठेवण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले.मोठा पोलीस बंदोबस्तगांधी रोडवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही आग विझविण्यासाठी पोलिस यंत्रणाही झपाटयाने कामाला लागली होती. घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शहरातील सातहि पोलीस स्टेशनचे ठाणेदार हजर आहेत.आगीचे कारण अस्पष्टउत्सव संकुलला लागलेल्या भीषण आगीचे कारण अस्पष्ट आहे. मात्र घटनास्थळावर विविध तर्कवितर्क लावण्यात येत होते. मार्च एंन्डींगच्या लगबगीत आग लागल्याने अनेकांनी वेगळया प्रकारची शंकाही घटनास्थळावर व्यक्त केली.