शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापौर पदासाठी अग्रवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 01:54 IST

अकोला महापालिका उपमहापौर पदासाठी वैशाली शेळके यांची उमेदवारी

अकोला, दि. ४- महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्यावतीने महापौर पदासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल तसेच उपमहापौर पदासाठी वैशाली विलास शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या दोन्ही पदांसाठी संबंधित उमेदवारांनी पालिकेत शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत २0 प्रभागांतील ८0 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली, असता भाजपने तब्बल ४८ जागांवर विजय प्राप्त केल्याचे समोर आले. मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच अकोलेकरांनी राजकीय पक्ष म्हणून भाजपला बहुमत दिल्याने महापालिकेत सत्ता स्थापनेदरम्यान होणार्‍या आर्थिक घोडेबाजाराला आपसूकच लगाम बसला आहे. निवडणूक आटोपल्यानंतर महापौर, उपमहापौर पदाच्या निवड प्रक्रियेसाठी विशेष सभेचे आयोजन करावे लागते. त्यानुषंगाने महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले असता, ९ मार्च ही तारीख निश्‍चित करण्यात आली. ३ मार्च रोजी उमेदवारी अर्जांचे वाटप केल्यानंतर ४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया होती. भाजपला बहुमत मिळाल्याने महापौर, उपमहापौर पदाचे दावेदार कोण, याकडे संपूर्ण अकोलेकरांचे लक्ष लागले होते. भाजपच्यावतीने महापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल तसेच उपमहापौर पदासाठी वैशाली शेळके यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, माजी महापौर सुमनताई गावंडे, हरीश आलिमचंदानी, गीतांजली शेगोकार, प्रवीण जगताप उपस्थित होते. अन् दोघांचे मनोमिलन झाले!महापौर, उपमहापौर पदासाठी आपल्या गोटातील उमेदवारांची वर्णी लागावी, यासाठी भाजपमधील अंतर्गत राजकारणाने उचल खाल्ली होती. धोत्रे गटाकडून विजय अग्रवाल, वैशाली शेळके यांची नावे समोर आल्यानंतर, दुसर्‍या गटातून हरीश आलिमचंदानी,आशिष पवित्रकार यांना पसंती देण्यात आली. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या दिवशी मात्र हरीश आलिमचंदानी यांनी अर्ज सादर केला नाही. विजय अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही ज्येष्ठ नगरसेवकांनी त्यांच्या मूळ स्वभावाचा परिचय करून देत मनोमिलन केल्याचे दिसून आले. भाजपच्यानंतर काँग्रेसचे सर्वाधिक १३ उमेदवार विजयी झाले आहेत. महापौर पदासाठी काँग्रेसच्यावतीने शेख मोहम्मद नौशाद यांनी, तर उपमहापौर पदासाठी सुवर्णरेखा जाधव यांनी उमेदवारी दाखल केली. यावेळी काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, साजीद खान पठाण, शाहीन अंजूम, पराग कांबळे, शेख इब्राहिम उपस्थित होते. उपमहापौर पदासाठी शिवसेना मैदानात उतरली असून, शिवसेनेचे राजेश मिश्रा, गजानन चव्हाण यांनी अर्ज सादर केला.