शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

शेतक-यांवर पुन्हा अस्मानी संकट!

By admin | Updated: December 24, 2014 01:20 IST

कपाशीवर लाल्या, तुरीवर किडींचा हल्ला; हरभरा किडींनी केला फस्त.

मनोज भिवगडे /अकोलानापिकी आणि कर्जबारीपणामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा अस्मानी संकटाने अडचणीत आला आहे. अल्पशा पावसामुळे खरिपाचे पीक हातातून गेलेल्या शेतकर्‍यांनी रब्बीच्या पिकांकडे आशेने बघणे सुरू केले होते, मात्र किडीने रातोरात होत्याचे नव्हते करून शेतकर्‍यांना पुन्हा अडचणीत आणले आहे. कपाशीवर लाल्या आणि तुरीवर आलेल्या किडीपाठोपाठ बोनोसेफॅलम बीटल (काळ्य़ा म्हशी) या किडींनी हरभराही फस्त केला आहे. याचा सर्वाधिक फटका खारपाणपट्टय़ातील हजारो कोरडवाहू शेतकर्‍यांना बसला आहे. यंदाच्या पावसाळ्य़ात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. १0 सप्टेंबरपासून जिल्ह्यात पिकांसाठी आवश्यक पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरिपातील पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीन पेरणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला. त्यापुढील ४0 दिवस पाऊस न झाल्यामुळे रब्बीचा पेराही खोळंबला. साधारणत: १५ ऑक्टोबरच्या सुमारास रब्बीतील हरभर्‍याची पेरणी केली जाते. पाऊस नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी पेरणीच केली नाही. काहींनी धाडस करून कोरड्या जमिनीतच महागडे बियाणे टाकले, मात्र तेही उगवले नाही. त्यामुळे दुबार आणि त्यानंतर तिबार पेरणी करण्याचे संकट जिल्ह्यात शेतकर्‍यांवर कोसळले. त्यातही काही शेतकर्‍यांनी डिेझल पंपाच्या मदतीने आणि टॅक्टरवर पाणी शेतात नेऊन हरभरा, तूर, कपाशी या पिकांना पाणी दिले, मात्र हवामानातील बदलानंतर या पिकांवर किडींचा प्रादरुभाव झाल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तुरीचा फुलोर ढगाळ वातावरणामुळे गळला, तर कपाशीचे पीक लाल्या रोगामुळे नष्ट होणार्‍या मार्गावर आहे. लाल्या रोगाचा फटका मूर्तिजापूर तालुक्यासोबतच अकोला आणि आकोट तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकर्‍यांना बसला. खारपाणपट्टय़ातील तुरीचा फुलोर मागील आठवड्यात गळल्यामुळे म्हैसांग, अंबिकापूर, दापुरा, कट्यार, मजलापूर आदी परिसरातील तुरीचे पीक हातातून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.