शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या इशार्‍यानंतर संप मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:40 IST

अकोला: शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांचा भूखंड हडप  प्रकरणामध्ये भूमी अभिलेख विभागातील तीन कर्मचार्‍यांना  निलंबित केल्यानंतर यामधील दोन कर्मचार्‍यांचे निलंबन मागे  घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागातील कर्मचार्‍यांनी आंदोलन  सुरू करताच तातडीने कामावर रुजू न झाल्यास या कर्मचार्‍यांवर  कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिल्यानंतर हा सं प माग घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देभूमी अभिलेख विभागाच्या कर्मचार्‍यांनी घेतला निर्णयएका नगरसेवकाचाही सहभाग - तक्रारकर्त्याचा आरोप 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांचा भूखंड हडप  प्रकरणामध्ये भूमी अभिलेख विभागातील तीन कर्मचार्‍यांना  निलंबित केल्यानंतर यामधील दोन कर्मचार्‍यांचे निलंबन मागे  घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागातील कर्मचार्‍यांनी आंदोलन  सुरू करताच तातडीने कामावर रुजू न झाल्यास या कर्मचार्‍यांवर  कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिल्यानंतर हा सं प माग घेण्यात आला आहे.शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी  १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या  नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘ पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किम तीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित  दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील  अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल  मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भू खंड कागदोपत्री हडपला. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर  आणले. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातही तक्रार करण्यात  आली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय  यांच्या आदेशानंतर व चौकशी करून उपसंचालक बी. डी.  काळे यांनी तीन कर्मचार्‍यांना निलंबित केले. त्यानंतर भुमी  अभिलेखच्या कर्मचार्‍यांनी या विरोधात संप पुकारीत वेठीस  धरल्याचा प्रयत्न केला, या कर्मचार्‍यांवर कलम २३ नुसार  कारवाई करण्याचे निर्देश देताच संप मागे घेण्यात आला.

एका नगरसेवकाचाही सहभाग - तक्रारकर्त्याचा आरोप हा भूखंड घोटाळा शिवाजी काळे या कर्मचार्‍याने केल्याचा  आरोप कर्मचार्‍यांसह तक्रारकर्त्यांकडून करण्यात आला आहे.  शिवाजी काळेसोबत एक नगरसेवकही या घोटाळय़ात सहभागी  असून, पोलिसांनी तातडीने या दोघांची चौकशी केल्यास या  परिसरातील आणखी हडपलेले भूखंडही उघड होणार  असल्याचे तक्रारकर्ते अमर डिकाव यांचे म्हणणे आहे. एक भू खंड घोटाळा बाहेर आला असून, याच परिसरातील आणखी  एक शासनाचा भूखंड अशाच प्रकारे हडप करून त्याचा खरेदी- विक्रीचा व्यवहारही पार पडल्याची माहिती आहे.भूमी अभिलेख विभागाच्या संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन  भूखंड हडप करण्यासाठी पूर्ण कट रचण्यात आला. यामध्ये  सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांची नावे उघड  करण्याऐवजी या घोटाळेबाजांना वाचविण्यासाठी आंदोलन  छेडण्यात आले, यावरून चोर तर चोर वरून शिरजोर  असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. ज्या कर्मचार्‍यांनी  आंदोलन सुरू केले त्यांनीच खर्‍या दोषींची नावे उघड करण्याचे  आव्हानही करण्यात आले आहे.