शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील गणेश मिरवणूक मार्गावरील ‘पोस्टर वॉर’ बाद

By admin | Updated: September 28, 2015 02:21 IST

राजकीय पक्ष, नेत्यांचे फलक झळकलेच नाही.

अकोला: गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर शहरातील चौका-चौकांत झळकणारे विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नेत्यांचे फलक यंदा पहिल्यांदाच झळकले नाही. त्यामुळे शहरात गणेश विसर्जन मार्गावरील 'पोस्टर वॉर' यंदा बाद झाल्याचे रविवारी गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान आढळले. अकोला शहरातील गणेश विसर्जन मार्गावर चौका-चौकांत दरवर्षी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नेत्यांकडून गणेशभक्तांचे स्वागत करणारे पोस्टर, बॅनर्स, फलक झळकत असतात. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आमने-सामने झळकविण्यात येणार्‍या फलकांमुळे 'पोस्टर वॉर'चा अनुभव शहरातील नागरिकांनी अनुभवला आहे. तसेच शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर मोठय़ा प्रमाणात लावण्यात येणार्‍या फलकांमुळे मिरवणूक मार्गावरील प्रत्येक चौक पोस्टरमय झाल्याचे जाणवत होते. यावर्षी मात्र पहिल्यांदाच गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील गांधी चौक, सिटी कोतवाली चौक, टिळक रोड व इतर चौकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नेत्यांचे फलक लावण्यात आल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे दरवर्षी गणेश विसर्जन मार्गावर झळकणार्‍या फलकांमुळे पोस्टर वॉरचे चित्र यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर दिसले नाही. त्यानुषंगाने शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील 'पोस्टर वॉर' बाद झाल्याची बाब यावर्षी पहिल्यांदाच शहरातील गणेश विसर्जनदरम्यान जाणवली.