शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर होणार मीटरगेज रेल्वे मार्ग बंद!

By admin | Updated: October 9, 2016 02:56 IST

दक्षिण मध्य रेल्वे; अधिका-यांचे संकेत.

राम देशपांडे अकोला, दि. 0८- जिल्हा प्रशासनाने संपादित केलेली जमीन, दक्षिण मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केल्यानंतर अकोला-आकोट मीटरगेज परिवर्तनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, तीन रेल्वे पूल उभारणीचे कंत्राटदेखील अलाट करण्यात आले आहे. मार्ग रुंदीकरणाकरिता ह्यरेल्वेह्णकडे पर्याप्त निधी उपलब्ध असून, दिवाळीनंतर अकोला-आकोट मीटरगेज रेल्वे मार्ग बंद करून काम सुरू होणार असल्याची शक्यता दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. व्याघ्र प्रकल्पातून जाणार्‍या रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची अद्याप परवानगी मिळाली नसली, तरी अकोला-आकोटदरम्यानचा मीटरगेज रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणास लवकरच म्हणजे दिवाळीनंतर प्रारंभ होणार असल्याची शक्यता सिकंदराबाद येथील रेल्वे बांधकाम विभागाचे अधिकारी नागभूषण यांनी वर्तविली आहे. या मार्गावरील तीन मोठय़ा रेल्वे पुलांच्या उभारणीसाठी मध्यंतरी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ती पूर्ण झाली असून, त्यांचे कंत्राट सिकंदराबादच्या कंपनीला देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मार्ग रुंदीकरणासाठी सध्याचा मीटरगेज रेल्वे मार्ग तातडीने बंद करण्याची गरज नसली तरी दिवाळीनंतर तो बंद केला जाऊ शकतो, असे मत त्यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले. आकोट-महू मार्ग सुरू राहणारअकोला-आकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणादरम्यान आकोट-महूदरम्यान मीटरगेज रेल्वे मार्ग सुरू राहणार असून, या मार्गावर महू पॅसेंजर नियमित धावणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.