शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सुकळी योजनेच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता

By admin | Updated: March 17, 2016 02:29 IST

६४ गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा करण्याची योजना.

अकोला: जिल्ह्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या गावांना सुकळी येथील तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेच्या अंदाजपत्रकास अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) अधीक्षक अभियंत्याकडून तांत्रिक मान्यता देण्यात आली. त्यामुळे तांत्रिक मान्यतेत अडकलेल्या या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने महान येथील काटेपूर्णा धरणात उपलब्ध अत्यल्प जलसाठा अकोला शहर पाणीपुरवठा योजनेसाठी राखीव करण्यात आला. त्यामुळे गत सप्टेंबरपासून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना सुकळी येथील तलावातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; मात्र सुकळी तलाव ते खांबोरा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंंतची जलवाहिनी कमी व्यासाची असल्याने योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या १५ ते २0 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असून, या भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यानुषंगानेसुकळी तलाव ते खांबोरा येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंंंत नवीन जलवाहिनी टाकणे व पाण्याची उचल करण्यासाठी नवीन पंप बसविण्यासाठी १२ कोटी ४0 लाख रुपयांच्या योजनेचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे तांत्रिक मान्यतेसाठी महिनाभरापूर्वी सादर करण्यात आले; परंतु गत महिनाभरापासून या योजनेच्या अंदापत्रकास तांत्रिक मान्यता मिळाली नाही. या पृष्ठभूमीवर ह्यतांत्रिक मान्यतेत अडकली सुकळी पाणीपुरवठा योजनाह्ण यासंबंधीचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये ७ मार्च रोजी प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सुकळी तलावातून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेच्या अंदाजपत्रकास अखेर ९ मार्च रोजी मजीप्राच्या अधीक्षक अभियंत्यांमार्फत तांत्रिक मान्यता देण्यात आली. तांत्रिक मान्यता मिळाल्याने या योजनेचा मार्ग मोकळा झाला असून, योजनेच्या प्रस्तावाला शासनामार्फत प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात येणार आहे.