शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ६४ गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत!

By admin | Updated: September 21, 2016 02:05 IST

काटेपूर्णा धरणातून सोडले पाणी; आठ दिवसांनंतर सुरू झाला पाणीपुरवठा.

अकोला, दि. २0 - महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा आठ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा अखेर मंगळवारपासून पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या गावांचा गत आठ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरू झाला आहे.जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र गतवर्षी पाणीटंचाईच्या परिस्थितीत गत उन्हाळ्यात खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. गत जुलैमध्ये पावसाच्या पाण्याने खांबोराजवळील उन्नई बंधारा भरला होता. त्यामुळे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत उन्नई बंधार्‍यातून ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; परंतु ९ सप्टेंबर रोजी उन्नई बंधार्‍यातील पाणी संपले. बंधारा ह्यड्रायह्ण झाल्याने गत १२ सप्टेंबरपासून ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे पावसाळयातच ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अकोला उपविभाग कार्यालयामार्फत अकोला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्यानुषंगाने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाटबंधारे विभागामार्फत महान येथील काटेपूर्णा धरणातून 0.८0 दशलक्ष मीटर पाणी काटेपूर्णा धरणात सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडण्यात आलेले पाणी खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यात पोहोचल्यानंतर २१ सप्टेंबरपासून खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पूर्ववत सुरू करण्यात आला. त्यामुळे गत आठ दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठा सुरू झाल्याने ६४ गावांमधील जलसंकट टळले आहे.