शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

१५ तासांच्या मनधरणीनंतर ग्रामस्थ परतले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:04 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून  पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोण त्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले होते. त्यांना पुन्हा  पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिकार्‍यांनी  तब्बल १५ तास मनधरणी केली. मात्र, ते बधले नाहीत.  मात्र, मध्यरात्री आमदार बच्चू कडू व मेळघाटचे माजी  आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासींसोबत कोरकूमध्ये  संवाद साधत मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार  पाण्डेय यांनी पुर्नवसित गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविणार,  अशी ग्वाही दिल्यावर दोन हजारांवर अदिवासी वाहनांमध्ये  बसून पुनर्वसित वस्तीत परतले.

ठळक मुद्देप्रशासनाची ग्वाही पुनर्वसित गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविणार! 

प्रभाव लोकमतचालोकमत न्यूज नेटवर्कअकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातून  पुनर्वसित झालेले हजारो आदिवासी पुनर्वसित वस्तीत कोण त्याच सुविधा नसल्याने मूळगावी परतले होते. त्यांना पुन्हा  पुनर्वसनाच्या ठिकाणी परत नेण्याकरिता जिल्हाधिकार्‍यांनी  तब्बल १५ तास मनधरणी केली. मात्र, ते बधले नाहीत.  मात्र, मध्यरात्री आमदार बच्चू कडू व मेळघाटचे माजी  आमदार राजकुमार पटेल यांनी आदिवासींसोबत कोरकूमध्ये  संवाद साधत मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार  पाण्डेय यांनी पुर्नवसित गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविणार,  अशी ग्वाही दिल्यावर दोन हजारांवर अदिवासी वाहनांमध्ये  बसून पुनर्वसित वस्तीत परतले. यामुळे तीन दिवसांपासून  तणावात असलेल्या शासकीय यंत्रणेने रविवारी रात्री १ वाज ता मोकळा श्‍वास घेतला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभाक्षेत्रातील सदर गावांचे  पुनर्वसन अकोट तालुक्यात करण्यात आले आहे. या  गावांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्याकरिता जिल्हाधिकारी  आस्तिककुमार पाण्डेय आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी  अभिजित बांगर यांनी  १0 सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री  १ वाजेपयर्ंत ग्रामस्थांशी संवाद साधून शासनाच्या योजना  आपल्यापयर्ंत तातडीने पुरविल्या जातील, असा दिलासा  ग्रामस्थांना दिला. अकोट तालुक्यातील पुनर्वसित  गुल्लरघाट, सोमठाणा,  धारगड, अमोना कासोद, केलपाणी  सोमठाणा लगत आणि  केलपाणी गुल्लरघाट लगत या गावांमध्ये  येत्या महिनाभरात  कामे पूर्ण केली जाणार आहेत. पुनर्वसित गावांमध्ये  कुठल्याही प्रकारे ग्रामस्थांना अडचण भासू दिली जाणार  नाही. असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय  यांनी केले आहे. 

३३५ घरकुल उभारणार! सोमवारी सकाळी जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांची  बैठक घेऊन पुनर्वसित गावांमध्ये तातडीने  विविध योजनें तर्गत सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, शबरी  घरकुल योजनेतंर्गत गुल्लरघाट गावात ५५ घरकुल,  सोमठाणा गावात ३५, धारगड गावात ७५, अमोना कासोद  येथे ५९, केलपाणी सोमठाणा लगत येथे ७५ आणि केल पाणी गुल्लरघाट लगत येथे  ३६, असे एकूण 335 घरकुल  बांधण्यात येणार आहेत. 

५0७ शौचायलांची निर्मितीस्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुल्लरघाट गावात ७५  शौचालय,  सोमठाणा येथे १२८ शौचालय, धारगड येथे १0२  शौचालय, अमोना कासोद येथे २५ शौचालय, केलपाणी   सोमठाणा लगत येथे  १३७ शौचालय आणि केलपाणी  गुल्लरघाट लगत येथे ४0 शौचालय, असे एकूण ५0७  शौचालय बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा व अंगणवाडीची सुविधा सोमठाणा येथे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू असून,  गुल्लरघाट येथे लवकरच अंगणवाडी इमारतीचे काम सुरू  करण्यात येणार आहे. सदर गावांमध्ये पाणीपुरवठा योजने तंर्गत दोन कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री पेयजल योजनामध्ये  पाठविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ठा क्कर बप्पा योजनेंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण व सांडपाणी  नाल्यांच्या बांधकामासाठी ५२.५ लाख रुपयांच्या निधीस  जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिली आहे. तसेच प्रकल्प  अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभागामार्फत  गावांतील नवयुवकांना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षणही  दिले जाणार आहे. 

समिती गठित, मुंबईत बैठक पुनर्वसित आदिवासींवर अन्याय झाल्याची कबुली देत त्यांना  न्याय मिळवून देण्यासाठी अमोना, नागरतास, गुल्लरघाट,  केलपाणी, सोमठाणा खु., सोमठाणा बु., धारगड, बारूखेडा  या आठ गावांतील प्रत्येकी एक प्रतिनिधी माजी आमदार  राजकुमार पटेल, आ. सुनील देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री व  सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार  आहेत.