शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शपथपत्रात गुन्ह्याची माहिती दडवली; हातगाव सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST

२०२० मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान अक्षय जितेंद्र राऊत यांनी प्रभाग ५ मधून ग्रामपंचायत सदस्याकरिता २४ डिसेंबर २०२० रोजी ...

२०२० मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान अक्षय जितेंद्र राऊत यांनी प्रभाग ५ मधून ग्रामपंचायत सदस्याकरिता २४ डिसेंबर २०२० रोजी उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी उमेदवारी अर्जासोबत त्यांचे शपथपत्रसुद्धा जोडले होते. सदर शपथपत्रात उमेदवाराची गुन्हेगारीसंबंधी माहिती विचारली होती. त्यामध्ये कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे सरपंच अक्षय राऊत यांनी म्हटले आहे. परंतु त्यांच्यावर ३२४, ५०४, ३४ नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या संदर्भात सुरेश पुंडलिक जोगळे यांनी ३ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी यांना तशी तक्रार दाखल केली होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी ४ फेब्रुवारी रोजी तहसीलदार मूर्तिजापूर यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीदरम्यान अक्षय राऊत यांनी शपथपत्रात गुन्हेगारीची माहिती दडवली असल्याचे निष्पन्न झाले. यावरून नायब तहसीलदार (निवडणूक) आर.एम. पांडे यांनी २ जुलै रोजी शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार हातगावचे सरपंच अक्षय राऊत (२५) यांच्या विरुद्ध राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार १७१ जी, १७७, १८१ नुसार गुन्हा दाखल केला.