शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
4
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
5
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
6
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
7
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
8
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
9
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
10
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
11
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
12
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
13
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
14
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
15
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
16
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
17
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
18
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
19
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
20
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
Daily Top 2Weekly Top 5

११ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 13:28 IST

अकोला : जिल्ह्यातील बाळापूर आणि तेल्हा तालुक्यातील ११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी २४ लाख ७४ हजार ४०२ रुपयांच्या उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दिला.

अकोला : जिल्ह्यातील बाळापूर आणि तेल्हा तालुक्यातील ११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी २४ लाख ७४ हजार ४०२ रुपयांच्या उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दिला. त्यामध्ये विंधन विहीर आणि कूपनलिकांच्या कामांचा समावेश आहे.जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत प्राप्त प्रस्तावानुसार बाळापूर तालुक्यात एका गावात विंधन विहीर आणि तेल्हारा तालुक्यातील १० गावांत १० कूपनलिकांच्या कामांना जिल्हाधिकाºयांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. २४ लाख ७४ हजार ४०२ रुपये खर्च अपेक्षित असलेल्या उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने संबंधित ११ गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.गावनिहाय मंजूर उपाययोजनांची अशी आहेत उपाययोजनांची कामे!बाळापूर तालुक्यातील बारलिंगा या एका गावात एक विंधन विहीर उपाययोजनेच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे, तर तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार, निंभोरा बु., निंभोरा खुर्द, सदरपूर, अकरमपूर, तुदगाव, तळेगाव डवला, तळेगाव वडनेर, बोरव्हा व कोठा या दहा गावांमध्ये कूपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.कामे १५ जोनवारीपर्यंत पूर्ण करण्याचा करण्याचा आदेश!प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाची कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे लक्ष देण्याचा आदेशही जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह संबंधित यंत्रणांना दिला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय