शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चार सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता!

By admin | Updated: April 7, 2017 01:12 IST

अकोला- अनेक प्रयत्नानंतर जिल्ह्यातील चार छोट्या सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे; परंतु कालव्याची तरतूद नसल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

अकोला : अनेक प्रयत्नानंतर जिल्ह्यातील चार छोट्या सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे; परंतु काही प्रकल्पांना कालव्याची तरतूद नसल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, सात वर्षांपूर्वी ६२ कोटी किंमत असलेल्या या प्रकल्पाच्या बांधकामासाठी आता २२३ कोटी खर्च करावा लागणार आहे.जिल्ह्यात शहापूर बृहत, शहापूर लपा व वाई व अन्य एका प्रकल्पाला नुकतीच शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामधील अकोट तालुक्यातील शहापूर बृहत या लघू पाटबंधारे योजनेला तर गत पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर आता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. २७ फेब्रुवारी २००९ मध्ये या योजनेची २००१-२००२ च्या दरसूचीनुसार ६२ कोटी ७६ लाख ५८ हजार इतक्या किमतीस मूळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती; पण त्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यतेस सहा ते सात वर्षांचा कालावधी लोटला. या दीर्घ कालावधीत योजनेच्या दरसूचीतील बदलामुळे यात वाढ झाली, तसेच जास्त दराच्या निविदा, भूसंपादन खर्चातील वाढ, संकल्पनेतील बदल, इतर कारणे, आनुषंगिक खर्च इत्यादी कारणामुळे या योजनेची आजमितीस मूळ प्रशासकीय मान्यता किमतीच्या दहा टक्क्यांहून अधिक वाढत असल्यामुळे प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणे क्रमप्राप्त होते.या पृष्ठभूमीवर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने या योजनेच्या बांधकामासाठी २२३ कोटी ४१ लाख २३ हजार रुपये किमतीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यामध्ये २०७ कोटी २१ लाख ६५ हजार बांधकामासाठी तर १६ कोटी १९ लाख ५८ हजार रुपये आनुषंगिक खर्चाची तरतूद आहे. या अंदाजपत्रकात २०१३-१४ या वर्षांच्या दरसूचीप्रमाणे दर वापरण्यात आले आहे. ही योजना पूर्ण झाल्यास यात ७.७९ दशलक्ष घनमीटर जलसाठा संकलित होणार असून, १३८८ हेक्टरवर सिंचन होणार आहे. दरम्यान, या लघू पाटबंधारे योजनेच्या बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देताना कालव्याचा विचार केला नसल्याचे दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठीच सहा ते सात वर्षांचा कालावधी लागला, तर कालव्यासाठी किती लागेल, असे प्रश्न निर्माण करण्यात येत आहेत. या योजनेला पाच कि.मी.चा कालवा आहे; परंतु बंद पाइपद्वारे पाणीपुरवठा करण्यासंबंधी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे बंद पाइपद्वारे सिंचनासाठी लवकरच स्वतंत्र आराखडा तयार करू न पाठविला जाणार आहे.- विजय लोळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अकोला.