शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पडीत वॉर्ड बंद करण्यासाठी प्रशासन सरसावले

By admin | Updated: January 31, 2015 00:39 IST

कंत्राटदार-नगरसेवकांच्या संगनमतावर टाच.

अकोला : पडीत वॉर्डांंच्या माध्यमातून उखळ पांढरे करणार्‍या नगरसेवक-कंत्राटदारांच्या संगनमताला लवकरच आळा घातला जाणार आहे. पडीत वॉर्ड ही संकल्पना मोडीत काढण्यासाठी प्रशासन सरसावले असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते बंद केले जाणार असल्याची माहिती आहे. संबंधित प्रभागात आस्थापनेवरील सफाई कामगारांच्या नियुक्तीचे नियोजन केले जाणार असले तरी या प्रयोगात प्रशासन कितपत यशस्वी ठरते, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.शहरातील ३६ प्रभागांपैकी पडीतच्या २१ प्रभागांमध्ये (४२ वॉर्ड) साफसफाई व स्वच्छतेच्या कामासाठी मनपाने खासगी कंत्राटदारांची नियुक्ती केली. बहुतांश पडीत प्रभागातील साफसफाईचे कंत्राट नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी मिळवले. प्रभागातील नाल्या, सर्व्हिस लाइन, रस्त्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासह झाडे-झुडुपे, गवत काढण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी १५ खासगी सफाई कर्मचार्‍यांची नियुक्ती केली. याबदल्यात मनपाकडून महिन्याकाठी ५0 हजार रुपयांची घसघशीत रक्कम कंत्राटदारांच्या खिशात कोंबली जाते. पडीत प्रभागांमध्ये दैनंदिन ६00 सफाई कर्मचारी काम करतात, असा दावा नगरसेवक व कंत्राटदारांकडून केला जातो. दुसरीकडे सभागृहात सर्वच नगरसेवक प्रभागात नियमित साफसफाई होत नसल्याचे खापर प्रशासनाच्या मस्तकी फोडतात. सफाईची खासगी कंत्राटं रद्द करण्याची भाषा मात्र कोणीही वापरत नाही, हे येथे उल्लेखनीय. स्वच्छतेच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे पाहून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पडीत वॉर्ड ही संकल्पना बंद केली जाणार आहे. याकरिता उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने तयारीला लागल्याची माहिती आहे.