शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सडकछाप दारुड्यांपुढे प्रशासन हतबल; राज्य उत्पादन शुल्क म्हणते मनुष्यबळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 13:01 IST

अकोला : शहरातील मुख्य चौकात कुठेही बसा अन् खुशाल ढोसा, अशी स्थिती झाली आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार गंभीर आहे.

अकोला : शहरातील मुख्य चौकात कुठेही बसा अन् खुशाल ढोसा, अशी स्थिती झाली आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार गंभीर आहे; परंतु आमच्याकडे मनुष्यबळ नसल्याचे सांगत राज्य उत्पादन शुल्क सडकछाप तळीरामांपुढे हतबल झाल्याचे वास्तव समोर आले आहे.अकोला शहराची ओळख संवेदनशील शहर म्हणून आहे. किरकोळ वादातून येथे गंभीर गुन्हे घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरातील मुख्य चौकात बेकायदेशीर होत असलेली दारू विक्री आणि कुठेही बसून खुशाल ढोसण्याची प्रशासनाची मूकसंमती ही मोठ्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करू शकते. अशा स्थळांवर कारवाईसंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती विचारली असता, आमच्याकडे मनुष्यबळाचा अभाव आहे; मात्र पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने शहरात कारवाया करण्यात येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले; परंतु परिस्थिती विपरीत असून, शहरात उघड्यावरच बेकायदेशीररीत्या दारू विक्री आणि मुख्य चौकातच तळीरामांचा गोतावळा जमत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. वाढत्या गुन्हेगारीत शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीरशहरातील अनेक सायंकाळी कार्यालयीन वेळ संपल्यावर घरी परतण्याच्या घाईत असतात, तर विद्यार्थिनी शिकवणी वर्गातून घरी येत असतात. अशातच वाटेत दारुड्यांकडून घालण्यात येणारा गोंधळ आणि नशेत करण्यात येणारे अशोभनीय कृत्य महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे. राज्य उत्पादन शुल्क तसेच पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक कारवाई करण्याची गरज आहे.मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे शक्य नाही; मात्र पोलिसांच्या मदतीने उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर मुंबई दारूबंदी कायद्यानुसार कारवाया सुरूच आहेत.- राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग