शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खराब डाळीच्या पुरवठ्याने प्रशासनही गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:00 IST

जिल्ह्यातील खराब डाळ वाटप गोदामपालासह पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

अकोला : शासनाने शेतकऱ्यांकडून ‘एफएक्यू’ दर्जाचा हरभरा घेऊन त्याची भरडाई करणाºया मुंबईतील सप्तशृंगी कंपनीने विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील शिधापत्रिकाधारकांना खराब डाळीचा पुरवठा केला आहे. काही जिल्ह्यांत प्रशासनाच्या दबावामुळे डाळ वाटप झाले तरी अकोला जिल्ह्यातील खराब डाळ वाटप गोदामपालासह पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, नाफेडने खरेदी केलेल्या हरभºयाची भरडाई करण्यासाठी शासनाने नोव्हेंबर २०१८ मध्येच सप्तशृंगी कंपनीकडे काम दिले होते.अंत्योदय, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह तूर व हरभरा डाळ या दोन डाळींपैकी एक डाळ प्रत्येकी एक किलो ५५ रुपयेप्रमाणे वाटप करण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला. त्यासाठी हरभरा, तुरीची उचल करणे, भरडाई करणे, तयार डाळ एक किलोच्या पाकिटात बंद करून शासकीय गोदामात पोहोचविण्याचे काम नवी मुंबईतील सप्तशृंगी कंपनीला देण्यात आले. (एनईएमएल एनसीडीईएक्स ग्रुप कंपनी)मार्फत ही नियुक्ती करण्यात आली. शेतकºयांकडून खरेदी केलेला त्या कंपनीकडे नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या दोन झोनमधील जिल्ह्यांत डाळ पुरवठ्याचे काम आहे. या कंपनीने शासनाकडून अनेक जिल्ह्यांत खराब हरभरा डाळीचा पुरवठा झाला आहे. नाफेडकडे नोंदणी केल्यानंतर शेतकºयांचा एफएक्यू दर्जाचेच धान्य खरेदी केले जाते. अनेक शेतकºयांना तर एफएक्यूच्या निकषात बसत नसल्याने खरेदी केंद्रावरून परत करण्याचा उद्दामपणाही केला जातो. त्या शेतकºयाच्या नफ्या-तोट्याचा विचारही केला जात नाही. त्याचवेळी सप्तशृंगी कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रकारही शासन स्तरावर घडत आहे.मार्चपासून आली खराब डाळअकोला जिल्ह्यातील गोदामात मार्च २०१९ मध्ये काळसर, ओली असलेली खराब डाळ प्राप्त झाली. ती डाळ खराब असल्याचे दुकानदारांना पुरवठा झाल्यानंतर पुढे आले. डाळींच्या पाकिटात तर पीठच झाले आहे. ओल्या डाळींचे एकजीव गोळे तयार झाले आहेत. दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारक डाळ घेत नसल्याने ओरड सुरू झाली. त्यामुळे दुकानदारांनी डाळ परत करण्याचा सपाटा लावला. या प्रकाराने गोदामपाल जंगले, पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी चांगलेच धास्तावले. साठ्यातील ५० ते ६० क्विंटल डाळ खराब असल्याची अधिकाºयांची माहिती आहे. त्याची जबाबदारीही निश्चित केली जात आहे.

दुकानदारांना भुर्दंडविशेष म्हणजे, खराब डाळ शिधापत्रिकाधारकांनी घेतली नाही. ती परत गोदामात आणण्याचा भुर्दंडही अनेक दुकानदारांना पडला आहे. ही प्रक्रियाही नियमबाह्यपणे राबविण्यात आल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे.

गत काही महिन्यांपासून सप्तशृंगी मिलर्सकडून प्राप्त डाळ खराब असणे, या प्रकाराची जबाबदारी निश्चित केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल. -  बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

डाळ खराब असल्याची माहिती वरिष्ठांना दिली आहे. साठ्यातील खराब हरभरा डाळीचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला जाईल. त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल.

- योगेश जंगले, गोदाम व्यवस्थापक, शासकीय गोदाम, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला