शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

करमणूक कर कर्मचाऱ्यांचे समायोजन?

By admin | Updated: July 8, 2017 02:25 IST

‘जीएसटी’मुळे राज्याचे करमणूक कर विभाग निकामी

संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कजुलै महिन्यापासून देशभरात लागू झालेल्या (वस्तू व सेवा कर) जीएसटीमुळे अनेक राज्यांतील पूर्वीचा करमणूक कर विभागच गोठविला गेला आहे. करमणूक कर रद्द करून त्या ठिकाणी जीएसटी लागू झाल्याने महाराष्ट्राच्या करमणूक कर विभागातील शेकडो अधिकारी आणि कर्मचारी निकामी झाले आहेत. निकामी झालेल्या राज्यातील या ५२२ कर्मचाऱ्यांचे समायोजन महसूलच्या गौण खनिज विभागात होण्याची शक्यता असून, अमरावती विभागासह राज्यातील इतर महसूल विभागांकडून त्यासंबंधीचे प्रस्ताव मंत्रालयाकडे पोहोचले आहेत.जुलै महिन्यापासून देशभरात जीएसटी कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. केंद्र आणि राज्याचा कर एकाच वेळी वसूल केल्या जात असल्याने त्याचा प्रभाव राज्याच्या विविध खात्यांवर पडला आहे. महसूल विभागाच्या निर्मितीपासून जन्माला आलेल्या विक्रीकर खात्याचे नामकरण जीएसटीत झाले; पण करमणूक कर विभाग मात्र अधांतरी सापडले आहे. राज्य शासनाचा महसूल खात्याच्या करमणूक कर विभाग चित्रपटगृह संचालकांकडून ४० टक्के मनोरंजन कर वसूल करायचे. अकोलासारख्या जिल्ह्यातून दरमहा ५० लाखांचा महसूल गोळा व्हायचा; मात्र जीएसटीमुळे कर वसुलीची यंत्रणाच बदलली आहे. करमणूक कर अधिकाऱ्यांचे काम जीएसटी अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित झाल्याने १ जुलैपासून राज्यभरातील मनोरंजन कर विभागाला काम राहिले नाही. राज्यासह अकोला जिल्ह्यातील कर्मचारी-अधिकाऱ्यांवर ही पाळी आली आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सहायक कर अधिकारी, करमणूक कर निरीक्षक, लिपिक आणि शिपाई अशा एकूण आठ कर्मचाऱ्यांना महसूल विभागातीलच गौण खनिज विभागात समायोजित करावे, असा प्रस्ताव अमरावती विभागाकडे गेला आहे. दरम्यान, सर्वच विभागातून समान मागणी आल्याने हा प्रस्ताव मुंबईच्या मंत्रालयाकडे पाठविला गेला आहे. करमणूक कर विभागाचे सचिव, उपायुक्त, उपजिल्हाधिकारी, करमणूक कर तहसीलदार, लिपिक आणि शिपाई अशा ५२२ कर्मचाऱ्यांना राज्याच्या महसूल विभागातील गौण खनिज विभागात समान पदावर सामावून घेण्याचे प्रयोग सुरू आहेत.जीएसटीमुळे करमणूक कर विभागातील कर्मचाऱ्यांना कोणतेही काम राहिले नाही. त्यामुळे जुलै महिन्यापासून या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा पेच निर्माण झाला आहे. मंत्रालयात गौण खनिज विभागात समायोजन करण्याचा प्रस्ताव गेला आहे. त्यावर शासनाचा काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.- जी.जी. गिरी, सहायक करमणूक कर अधिकारी, अकोला.