शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन बुधवारपासून

By admin | Updated: April 3, 2017 02:42 IST

अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजनाची प्रक्रिया ५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे.

अकोला, दि. २- २0१६ व १७ च्या संच मान्यतेनुसार खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजनेचे वेळापत्रक शिक्षक आयुक्तांनी जाहीर केले असून, अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजनाची प्रक्रिया ५ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २00९ अंतर्गत इयत्ता नववी व दहावीची तुकडी व्यवस्था बंद केली असून, प्राथमिक शाळेत प्रत्येक वर्गात ३0 विद्यार्थी व उच्च प्राथमिक शाळेतील प्रत्येक वर्गात ३५ विद्यार्थी आणि नववी व दहावीत प्रत्येकी ४0 विद्यार्थी संख्या निश्‍चित करण्यात आली. विद्यार्थी संख्या कमी होत असल्यामुळे अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरतात. सुधारित संच मान्यता निकषानुसार २0१६ व १७ ची प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेची संच मान्यता प्रक्रिया करण्यात आली असून, या संच मान्यतेमध्ये विद्यार्थी पटसंख्येचे निकष लावल्यामुळे अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या समायोजनाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षक, आरक्षण व विषयनिहाय रिक्त जागा याची माहिती शिक्षण संस्था, मुख्याध्यापिकांना सादर करण्यास सांगितले आहे. शिक्षण संस्थेने माहिती न दिल्यास मुख्याध्यापकाने माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अतिरिक्त शिक्षक, आरक्षण व विषयानुसार रिक्त जागा व्यवस्थापनाने घोषित करण्यापूर्वी शाळांतर्गत व संस्थांतर्गत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण करावी आणि शिक्षणाधिकार्‍यांनी संस्थेकडून जाहीर केलेल्या व मान्यता दिलेल्या अतिरिक्त शिक्षक, आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनद्वारे समायोजन पोर्टलवर भरावी, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ५ ते १0 एप्रिलपर्यंंंंत संस्थांनी सर्व बाबींची पूर्तता करून शिक्षक संवर्गाची १ जानेवारी २0१७ रोजी सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून अतिरिक्त शिक्षक निश्‍चित करून शाळा, संस्थेंतर्गत समायोजन करावे. १0 ते २२ एप्रिलपर्यंंंत संस्थेकडील अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषयनिहाय रिक्त पदांसाठी शिक्षणाधिकार्‍यांची मान्यता द्यावी आणि १७ ते २६ एप्रिलपर्यंंंंत शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालकांनी तक्रारींचे निराकरण करावे, २९ एप्रिलपर्यंंंंत अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करावी आणि ५ मे रोजी संस्था, शाळांनी अतिरिक्त शिक्षकांची आरक्षण व विषयनिहाय रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करावी, असेही आदेशात म्हटले आहे.