शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

दोन गावांत ५७८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 15:53 IST

५७८ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण मंगळवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले.

अकोला : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपैकी पहिल्या टप्प्यात अकोला तालुक्यातील गोरेगाव व बाळापूर तालुक्यातील देगाव या दोन गावांत पात्र ८१० शेतकºयांच्या गावनिहाय याद्या सोमवारी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, त्यापैकी ५७८ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण मंगळवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात करण्यात आलेल्या १ लाख ११ हजार ३७७ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द -गोरेगाव बु. आणि बाळापूर तालुक्यातील देगाव या दोन गावांतील पात्र ८१० शेतकºयांच्या याद्या सोमवारी दोन्ही गावांत प्रसिद्ध करण्यात आल्या. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यानुसार संबंधित शेतकºयांची बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी तसेच बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्ज खात्यातील रक्कम यासंदर्भात प्रमाणीकरणाचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले. त्यामध्ये दोन्ही गावांतील ८१० शेतकºयांपैकी ५७८ शेतकºयांच्या बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक प्रमाणीकरणाचे काम मंगळवारी सायंकाळपर्यंत करण्यात आले असून, उर्वरित २३२ शेतकºयांची पडताळणी आणि आधार प्रमाणीकरणाचे काम अद्याप बाकी आहे.पडताळणीत १५ शेतकºयांच्याबोटांचे उमटले नाही ठसे!गोरेगाव आणि देगाव या दोन्ही गावात कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकºयांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामध्ये मंगळवारी दोन्ही गावात पडताळणीदरम्यान बायोमेट्रिक मशीनवर १५ शेतकºयांच्या बोटांचे ठसे उमटले नाही. त्यामुळे संबंधित शेतकºयांच्या पडताळणीचे काम तहसीलदारांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच देगाव येथील एका शेतकºयाचा आधार क्रमांक चुकीचा असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. असे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAdhar Cardआधार कार्ड