शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अडगाव ‘बंद’ प्रकरणी पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: February 4, 2017 02:39 IST

सहा आरोपींना अटक; पोलीस बंदोबस्तात वाढ

हिवरखेड (अकोला), दि. 0३- फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याच्या निषेधार्थ अडगाव बु. येथे काही युवकांनी हातात काठय़ा, तलवारी घेऊन गाव बंद करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी रात्री अडगाव बु. येथील ५0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहा जणांना अटक केली आहे. अडगाव बु. येथील शुभम ठाकूर या युवकाने १ फेब्रुवारी बुधवार रोजी अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र, मजकूर फेसबुक टाकल्यामुळे अडगाव येथे तणाव निर्माण झाला होता. ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी सदर युवकाविरुद्ध भादंवि २९५ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटकसुद्धा केली. सध्या ठाकूर हा पोलीस कोठडीत आहे. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी अडगाव बु. येथील काही युवकांनी बेकायदेशीर जमाव जमवून हातात लाठय़ा-काठय़ा, लोखंडी पाइप घेऊन जबरीने अडगाव ह्यगाव बंदह्ण करण्याचा प्रयत्न केला होता, तसेच इतर ग्रामस्थांना शिवीगाळ, दगडफेक केली होती. याप्रकरणी हवालदार राजेश भगत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अडगाव बु. येथील ५0 जणांवर भादंवि १४३, १४५, १४७, १४८, ५0५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ कलमान्वये गुरुवारच्या रात्री गुन्हे दाखल केले, तसेच यातील वसीम खा सलीम खा, मो. इरफान मो. अजीज, शे. आसीफ शे. खालीक, अनवर खा रसीद खा, आबिदअली जाफरअली व शे. यासीन शे. हुसेन या सहा जणांना अटक केली. दरम्यान, अडगाव बु. येथे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, एसडीपीओ राजेंद्र मनवरे यांनी भेटी देऊन ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले. अडगावात तणावपूर्ण शांतता असून, जादा पोलीस कुमक तैनात आहे. ठाणेदार कात्रे, उपनिरीक्षक शरद भस्मे, गोपाल दातीर, योगेश राठोड, महादेव शेंडे, सुनील धार्मिक आदी पोलीस पथक तळ ठोकून आहे.