शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 20:23 IST

कुरुम : माना पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या मधापुरी  शिवारात १३ जुलैला अनोळखी इसमाची हत्या करून, मृतदेह  मधापुरी येथील सुनील नीळकंठराव ठाकरे यांच्या शेतातील  विहिरीत टाकण्यात आला होता. घटनास्थळाची १ ऑगस्ट रोजी  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व बुधवारी अतिरिक्त जिल्हा  पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी पाहणी केली.

ठळक मुद्देमधापुरी शिवारातील खून प्रकरणमधापुरी शिवारात १३ जुलैला अनोळखी इसमाची हत्यमृतदेह सुनील ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत टाकण्यात आला  होता

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुम : माना पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या मधापुरी  शिवारात १३ जुलैला अनोळखी इसमाची हत्या करून, मृतदेह  मधापुरी येथील सुनील नीळकंठराव ठाकरे यांच्या शेतातील  विहिरीत टाकण्यात आला होता. घटनास्थळाची १ ऑगस्ट रोजी  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व बुधवारी अतिरिक्त जिल्हा  पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी पाहणी केली.

या  प्रकरणातील आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले  आहेत. मधापुरी येथे एका अज्ञात इसमाचा खून झाल्याचे १३ जुलै रोजी  समोर आले होते. या घटनेतील मृतक हा पश्‍चिम बंगाल व  बांग्लादेश सीमेवरील २४ परगणा मुंशीगिरी येथील रहिवासी  लालमहन खगमन मुंडा असल्याचे समोर आले आहे. तो आ पल्या सहकार्‍यांसह मजुरीकरिता गुजरात कच्छ येथे जात होता.  यादरम्यान १२ जुलैला रात्री हावडा-अहमदाबाद ही गाडी कुरुम  रेल्वे स्टेशनवर थांबली होती. दरम्यान, अज्ञात आरोपीने  लालमहन याची हत्या करून, मृतदेह कुरुम रेल्वे स्टेशनवरून  ३ कि.मी. असलेल्या मधापुरी शिवारातील एका शेतातील  विहिरीत टाकला होता. या प्रकरणात माना पोलिसांना आरोपींचा  शोध लावण्यात अपयश आले आहे. मृतकासोबत असलेल्या  मजुरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीसाठी  कच्छवरून अकोला येथे आणले होते. मात्र, त्यांच्याकडून  कुठलीही माहिती मिळाली नाही. या हत्याकांड प्रकरणाचा छडा  लावण्याकरिता १ ऑगस्टला दुपारी अकोला स्थानिक गुन्हे  शाखेने (एल.सी.बी) घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली  होती. बुधवार, २ ऑगस्टला दुपारी अतिरिक्त जिल्हा पोलीस  अधीक्षक विजयकांत सागर यांनी कुरुम रेल्वे प्लेटफार्मवरून  अंदाजे ३ कि.मी. अंतरावर असलेल्या घटनास्थळावर जाऊन  बारकाईने निरीक्षण केले. यावेळी त्याच्या समवेत मूर्तिजापूर उ पविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, माना पो.स्टे.  ठाणेदार मिलिंदकुमार बाहकर, कुरुम चौकीचे प्रभारी उ पनिरीक्षक राजेश जोशी, माना पो. उपनिरीक्षक चंदू पाटील,  पो.कॉ. नीलेश इंगळे, विजय मानकर, संदीप पवार, स्थानिक  गुन्हे शाखेचे मुंदे, संदीप राऊत, कुरुम, मधापुरी, खोडदचे  पोलीस पाटील आदी उपस्थित होते.