शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषदांमध्ये समायोजन करण्याचा आदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 12:44 IST

अकोला : खासगी अनुदानित शाळांसोबतच उर्दू शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय शासनाने दिला होता; परंतु अनेक महिने उलटूनही अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर समायोजनच करण्यात आले नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे शासनाने आता या अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषदमध्ये हजर करून नियुक्ती ...

ठळक मुद्देअतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर समायोजनच करण्यात आले नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. २0१७-१८ मध्ये खासगी माध्यमिक अनुदानित शाळांमधील ६८ शिक्षक अतिरिक्त ठरले होते.त्यापैकी ४७ शिक्षकांचे जिल्हास्तरावर विविध शाळांमधील रिक्त जागांवर समायोजन करण्यात आले.

अकोला: खासगी अनुदानित शाळांसोबतच उर्दू शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय शासनाने दिला होता; परंतु अनेक महिने उलटूनही अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर समायोजनच करण्यात आले नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे शासनाने आता या अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषदमध्ये हजर करून नियुक्ती देण्याचा आदेश ३१ आॅगस्ट रोजी शासनाने दिले आहेत.शिक्षण विभागाच्या माहितीनुसार २0१७-१८ मध्ये खासगी माध्यमिक अनुदानित शाळांमधील ६८ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी ४७ शिक्षकांचे जिल्हास्तरावर विविध शाळांमधील रिक्त जागांवर समायोजन करण्यात आले. उर्वरित २१ अतिरिक्त शिक्षकांचे विभागस्तरावर समायोजन करण्यात आले होते. त्यानंतर अल्पसंख्यक उर्दू शाळेतील अतिरिक्त शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाने मागविली होती. उर्दू माध्यमाचे ४९ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी ३ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले; परंतु जिल्ह्यात खासगी अनुदानित उर्दू शाळांमध्ये एकही रिक्त जागा नसल्यामुळे या ४७ अतिरिक्त शिक्षकांची यादी समायोजनासाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आली होती; परंतु या यादीकडे दुर्लक्ष करीत जिल्हा परिषद प्रशासनाने या शिक्षकांचे समायोजनच केले नाही. अशीच परिस्थिती राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमध्येसुद्धा दिसून आल्यामुळे राज्य शासनाने ही बाब गंभीर असून, अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषदेमध्ये हजर करून नियुक्ती द्यावी. सर्वप्रथम शिक्षकांची ज्येष्ठता यादी तयार करून जि.प. रिक्त जागांवर किती शिक्षकांची आवश्यकता आहे, हे निश्चित करून यादीनुसार ज्येष्ठ शिक्षकांना सामावून घ्यावे आणि उर्वरित शिक्षकांची यादी शिक्षण संचालकांकडे पाठवावी, असेही शासनाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)उर्दू शिक्षकांची बिंदुनामावली मंजूर नाही. माध्यमिक शिक्षकाचे विभागाचे रोस्टर पाहून, रिक्त जागा आहेत की नाही, याची माहिती घेऊनच या अतिरिक्त शिक्षकांना जि.प. मध्ये सामावून घेण्याची कारवाई करू.- संध्या कांगटे, प्रभारी शिक्षणाधिकारी,प्राथमिक, जि.प.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद