शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ADCC Bank Election : थकबाकीदार सभासद निवडणुकीस अपात्र ठरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 12:14 IST

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक यावर्षी होणार आहे.

- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा मध्यवर्ती बँकेचीनिवडणूक यावर्षी होऊ घातल्याने सेवा सहकारी व इतर संलग्नित सोसायट्यांमधून जिल्हा बँकेवर प्रतिनिधी पाठविण्याची लगबग अकोला व वाशिम जिल्ह्यात सुरू झाली आहे; परंतु दोन्ही जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्याचे ९० टक्के सभासद थकबाकीदार असल्याने सर्व सभासद निवडणूक लढण्यास पात्र ठरणार नसल्याचे वृत्त आहे.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक यावर्षी होणार आहे. त्या अनुषंगाने मतदरांची तात्पुरती यादी त्वरित तयार करायची आहे. त्याकरिता संस्थांच्या सदस्यांना ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत १६ जानेवारी २०२० निश्चित केली होती. तथापि, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या पत्रानुसार ठराव दाखवून करण्याची मुदत वाढविण्यात आली असून, आता ३१ जानेवरीपर्यंत संस्थाना ठराव देता येतील.यामध्ये बँकेच्या सदस्य असलेल्या प्राथमिक कृषी पतसंस्था जर असतील तर अशा संस्थेच्या संचालकाऐवजी त्या संस्थेच्या थकबाकीदार नसलेल्या एखादा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्याचा ठराव देता येणार आहे किंवा संस्था थकबाकीदार नसेल तर संस्थेच्या संचालक मंडळ सदस्याचाही प्रतिनिधी म्हणून ठराव करता येणार आहे. इतर संस्थाच्या बाबतीत विविध कलम अन्वयेच्या तरतुदी विचारात घेऊन ठराव नमुन्यात व ठरावासोबत प्रतिनिधींचा दाखला थकबाकीदार नसल्याचा जोडणे अनिवार्य आहे.

सेवा सहकारी संस्थाच्या थकबाकीदारांना जिल्हा बँकेवर पाठवता येणार नाही. पाठविले तर त्यांना निवडणुकीला उभे राहता येणार नाही. त्यामुळे प्रतिनिधींना सहभाग घेण्यासाठी हा विषय तातडीने वेगळा करण्याची गरज आहे.- डॉ. प्रवीण लोखंडे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाbankबँकElectionनिवडणूक