शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विभागातील घोटाळेबाजांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:44 IST

अकोला : आदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) सन २००३ ते ३१ मार्च २००९ दरम्यान कार्यरत आणि जबाबदार प्रकल्प अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई केली जात आहे.

ठळक मुद्देआदिवासी विकास विभागाच्या अकोला प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एम.जी.गायकवाड समितीने एकूण ४७६ दोषींवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस यापूर्वीच राज्य शासनाकडे केली आहे. घोटाळ्यातील दोषींवर पोलिसात फौजदारी दाखल करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

अकोला : आदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) सन २००३ ते ३१ मार्च २००९ दरम्यान कार्यरत आणि जबाबदार प्रकल्प अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई केली जात आहे. फौजदारी कारवाई करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून आदिवासी विकास विभागाच्या अकोला प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांमध्ये सहा हजार कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी माजी न्यायमूर्र्ती एम.जी.गायकवाड समितीने एकूण ४७६ दोषींवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस यापूर्वीच राज्य शासनाकडे केली आहे. दरम्यान, घोटाळ्यात कारवाईपासून बचाव करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आदिवासींच्या विकास योजनांमध्ये घोटाळेबाज अधिकाºयांची हयगय नको, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली. सोबतच माजी न्या. गायकवाड समितीच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी निवृत्त आयएएस अधिकारी पी.डी. करंदीकर यांची समिती नेमली. करंदीकर समितीच्या मदतीसाठी ‘एसआयटी’ने आदिवासी विकास विभागाच्या ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालय स्तरावर सेवानिवृत्त लेखापरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या अधिकाºयांकडे घोटाळ्यातील दोषींवर पोलिसात फौजदारी दाखल करण्याची जबाबदारी सोपविली आहे. पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकारी किंवा सहायक प्रकल्प अधिकारी यांची नियुक्ती केली. पोलिसात फौजदारी दाखल करताना आदिवासी योजनेत घोटाळेबाज अधिकाºयांवर योग्य ती कारवाई व्हावी, यासाठी एसआयटी चमू काम करीत आहे. तर घोटाळाप्रकरणी चौकशी समितीप्रमुख माजी न्यायमूर्ती गायकवाड यांनी दोषी असलेल्या ४७६ अधिकाºयांची यादी शासनाकडे अहवालाद्वारे सादर केली आहे. त्यामुळे यादीतील दोषींची नावे पडताळणी करण्यासाठी एसआयटीने चारही अपर आयुक्त कार्यालय स्तरावरील प्रकल्पनिहाय सन २००३ ते २००९ या नऊ वर्षांच्या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकारी, लेखाधिकाºयांच्या नावांची यादी मागविली.आदिवासी योजना घोटाळ्यात ४७६ जणांचा समावेश असल्याचे चौकशी समितीने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामध्ये अकोला प्रकल्प कार्यालयांतर्गत दोषींवर फौजदारीची तयारी एसआयटीने सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोला प्रकल्पातील घोटाळ््यासाठी जबाबदार असलेल्यांची पडताळणी सुरू आहे. प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांच्याकडे दोषींविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्याची जबाबदारी आहे. फौजदारी कारवाईसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्तीचे पत्र शासनाने पंधरा-वीस दिवसांपूर्वी दिले आहे. त्यानंतर पुढील कारवाईबाबत अद्याप निर्देश नाहीत. जबाबदार अधिकाºयांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत.

- विनिती सोनवणे, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला