शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा घोटाळ्यात आता शासन आदेशानुसार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:50 IST

अकोला: हरभरा बियाणे घोटाळ्यात महाबीजकडून झालेल्या  घोळाचा पडताळणी अहवाल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान  संचालकांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये महाबीजने  ८५ टक्के शेतकर्‍यांपर्यंत बियाणे पोहोचल्याचा दावा केला  असून, त्यापोटी अनुदान मिळण्याची मागणीही केल्याचे  महाबीजने पत्रकात म्हटले आहे, तर जिल्हा परिषदेच्या कृषी  अधिकार्‍यांकडून कृषी विभागाच्या अहवालानुसार वितरक,  कृषी केंद्र संचालकांच्या सुनावण्या सुरू असून, त्यावर शासन  निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी सांगितले. 

ठळक मुद्देकृषी विभाग, महाबीजचा पडताळणी अहवाल शासनाकडेलोकप्रतिनिधींची चुप्पी 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: हरभरा बियाणे घोटाळ्यात महाबीजकडून झालेल्या  घोळाचा पडताळणी अहवाल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान  संचालकांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये महाबीजने  ८५ टक्के शेतकर्‍यांपर्यंत बियाणे पोहोचल्याचा दावा केला  असून, त्यापोटी अनुदान मिळण्याची मागणीही केल्याचे  महाबीजने पत्रकात म्हटले आहे, तर जिल्हा परिषदेच्या कृषी  अधिकार्‍यांकडून कृषी विभागाच्या अहवालानुसार वितरक,  कृषी केंद्र संचालकांच्या सुनावण्या सुरू असून, त्यावर शासन  निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी सांगितले. हरभरा बियाणे घोटाळ्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्या त आला. त्यावर कृषी आयुक्तालयाने महाबीजला स्पष्टीकरण  मागविले. महाबीजने स्पष्टीकरण सादर करताना विक्रेत्यांना  विशेष अभियान राबवून लाभार्थी यादीत असलेल्या त्रुटी दूर  करण्याची संधी दिली. त्यासाठी विक्रेत्यांनी शेतकर्‍यांशी संपर्क  साधून त्यांचे प्रतिज्ञापत्र प्राप्त करून घेतले आहे. त्यावरून  जिल्हय़ातील ४६२८ पैकी ३८५८ पात्र शेतकर्‍यांना बियाण्याचे  वाटप झाल्याचा अहवाल महाबीजने तयार केला आहे. ८५ ट क्के पात्र लाभार्थींना बियाण्याचे वाटप झाले. त्यामुळे त्या  बियाण्याचे अनुदानही मिळावे, असा प्रस्ताव महाबीजने अन्न  सुरक्षा अभियान संचालकांकडे १८ सप्टेंबर रोजी सादर केला  आहे. कृषी विभागाच्या पथकांचा आधीचा अहवाल, त्यानंतर  आता महाबीजचा अहवाल शासनाकडे सादर झाला आहे.  त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात बियाणे वाटपात  केलेल्या घोळप्रकरणी कारवाईसाठी १४४ कृषी केंद्र  संचालकांच्या सुनावण्या सुरू आहेत. या प्रकरणात कारवाईचे  आदेश शासन स्तरावरून दिले जाणार आहेत. त्यामुळे आता  कोट्यवधी रुपयांचा हरभरा घोटाळा दाबला जाण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. 

लोकप्रतिनिधींची चुप्पी विशेष म्हणजे, कोणत्याही छोट्या-मोठय़ा प्रकरणात  अधिकार्‍यांना जाब विचारण्याची तयारी ठेवणारे जिल्हय़ातील  लोकप्रतिनिधी हरभरा घोटाळ्यात सुरुवातीपासूनच मूग गिळून  बसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आता शासन स्तरावरूनच हा  घोळ निस्तरला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पारदर्शक  शासनाच्या कार्यकाळात या घोटाळ्याचे काय होईल, हे आता  दिसून येणार आहे.