शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न घालणाऱ्या २५७  वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 20:14 IST

Akola News विविध भागात कारवाई करीत सुमारे २५७  मास्क न घालणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली.

अकोला : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा पादुभाव प्रचंड वाढत असताना आता प्रशासनाने मास्क न घालणारे तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणार्‍यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहर पोलिस उपअधीक्षक सचिन कदम परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अमर ठाकूर व सिटी कोतवाली चे ठाणेदार उत्तम जाधव यांनी बुधवारी शहराच्या विविध भागात कारवाई करीत सुमारे २५७  मास्क न घालणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन दुकानदारांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन न ठेवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाभर कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही शहरात मात्र त्याचे काहीही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. दर दिवसाला कोरोणाचे 150 ते 200 रुग्ण निघत आहेत. त्यामुळे हा धोका अधिक वाढत असताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहे; मात्र त्यानंतरही शहरात प्रचंड गर्दी होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शहर पोलीस उप अधीक्षक सचिन कदम, ठाणेदार उत्तम जाधव यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजेच 199 मास्क न घालणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर टिळक रोडवरील सुनील फॅशन ड्रेसेस मालक आनंद हरीमला अडवाणी, ताजनापेठ येथील रामाणि ब्रदर्स निरमा शिलाई मशीन मालक संतोष प्रकाशलाल रामाणी यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही दुकानात सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शहरातील वाढत असलेली रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आता पोलिस प्रशासनाने कंबर कसली असून मास्क न घालणारे तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणारयांवर कारवाई सुरू केली आहे. कारवाईचे हे सत्र गुरूवारपासून अधिक कठोरपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी दिली.

शहरातील कोणत्याही दुकानात चहा टपरी, पान टपरी, तसेच गर्दीच्या ठिकाणावर सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे व मास घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाचा उद्रेक होत असतानाच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहे. मात्र जे नागरिक या नियमाचा भंग करतील त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवारपासून ही कारवाई अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

- सचिन कदम, शहर पोलीस उप अधीक्षक अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाtraffic policeवाहतूक पोलीस