शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

योजनांच्या अंमलबजावणीसाठीही अ‍ॅक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 13:31 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणीची प्रक्रिया वेळेतच पूर्ण करण्याचे निर्देश पंचायत समित्यांना दिले आहेत.

अकोला: जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी दरवर्षी मार्च उजाडतो. प्रत्यक्षात योजना राबवण्यासाठी शासनानेही कालावधी ठरवून दिला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात प्रशासकीय पातळीवर कमालीची दिरंगाई होते. परिणामी, लाभार्थी वंचित राहतात, हा प्रकार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणीची प्रक्रिया आणि वेळापत्रकही ठरवून त्यानुसार प्रशासकीय स्तरावर मंजुरीपर्यंतची प्रक्रिया वेळेतच पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी विविध विभागांसह पंचायत समित्यांना दिले आहेत. त्याबाबतची माहिती त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य समाधान डुकरे उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील योजनांचे अर्ज २८ जूनपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर स्वीकारले जाणार आहेत. जिल्हास्तरावर २९ जून रोजी त्यांचे संकलन केले जाईल. १ जुलै रोजी पात्र, अपात्र अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २ जुलै रोजी आक्षेप व त्रुटींसाठी संधी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभेत ३ किंवा ४ जुलै रोजी मंजुरी दिली जाईल. मंजूर लाभार्थी यादी ५ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, सदस्यांनीही लाभार्थी निवड प्रक्रियेची माहिती संबंधितांना द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.- शाळा गुणवत्तेसाठी अ‍ॅक्शन प्लॅनशैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना शिकवण्याचा साप्ताहिक आराखडा, त्याचा पाठपुरावा, प्रत्येक चार महिन्यात चार चाचण्या, मास्टर ट्रेनर्ससोबत सातत्याने संपर्क, विस्तार अधिकाऱ्यांची तपासणी, शाळा भेट कार्यक्रम, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रेडिओच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण देण्याचाही उपक्रम राबवला जाणार आहे.- रुजू न होणाऱ्यांवर कारवाईजिल्हा परिषदेत एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले किंवा प्रतिनियुक्तीवर असलेल्यांची बदली करण्यात आली. त्यापैकी अनेक कर्मचारी कार्यमुक्त झाले नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. इतरत्र जाण्याची मानसिकता नसलेल्यांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी, असा दमही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद